वैष्णवांचा मेळा आज नगर मुक्कामी

0

निवृत्तीनाथांच्या दिंडीचे आगमन, उद्या समाधी सोहळा

अहमदनगर (प्रतिनिधी) – श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वरहून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी सकाळी नगरमध्ये दाखल झाला आहे. दिंडीचा आज नगरमध्ये मुक्काम राहणार असून उद्या निवृत्तीनाथ समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिंडी चालक स्वामीराज भिसे यांनी दिली.

सोमवारी दिंडी नगर तालुक्यातील डोंगरगणमध्ये मुक्कामाला होती. तेथून दिंडी मंगळवारी सकाळी नगरकडे मार्गस्थ झाली. महानगरपालिकेच्यावतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेविका निता घुले, अविनाश घुले उपस्थित होते.
उद्या दिंडीचा सोहळ्यातील महत्वाचा टप्पा असून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पान 2 वर 749 वा समाधी सोहळा आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ सर्वात महत्वपूर्ण असून वारकरी संप्रदायाचा पाया रोवण्याचे काम निवृत्तीनाथांनी केले आहे. यामुळे या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहवे असे आवाहन समाधी संस्थांचे अध्यक्ष संजय नाना धोंडगे, पंडीत महाराज कोल्हे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*