वैमानिकाच्या चुकीमुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात : एएआयबी

0

काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता.

विमान अपघात तपास पथकाच्या (एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो) प्राथमिक अहवालानुसार या अपघातासाठी हेलिकॉप्टरच्या वैमानिकाची चूक कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. वैमानिकाने हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असतानाही ‘टेक ऑफ’चा प्रयत्न केल्याने हा अपघात घडला.

लातूर जिल्ह्यातील निलंग्यात २५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर ८० फुटांवरून खाली कोसळले होते.

 

अपघाताच्या दिवशी लातूरमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांपेक्षा जास्त होता. जास्त तापमानामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणात अडथळा येतो. अशावेळी सुरक्षिततेसाठी हेलिकॉप्टरमध्ये कमी वजन घेऊन उड्डाण करणे अपेक्षित असतं. मात्र, वैमानिकाने या स्टँटर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरकडे (एसओपी) पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळेच विमाण उड्डाणानंतर लगेच खाली कोसळल्याचे ‘एएआयबीने म्हटले.

LEAVE A REPLY

*