वैद्यकीय महाविद्यालयात 200 जागा वाढविण्यास मंजूरी

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-होमिओपॅथी वैद्यकीय संघटनेच्या पाठपुराव्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 200 जागा वाढविण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.
होमिओपॅथी वैद्यकीय संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकीत महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे अध्यक्ष डॉ.अजित फुंदे, राजगोपाल देवरा, डॉ.प्रविण शिनगारे, डॉ.कुलदीप राज कोहली, डॉ.रावराणे, डॉ.श्रीमती सुडे उपस्थित होते. यावेळी राज्यातील पंजीकृत होमिओपॅथी वैद्यकीय व्यवसायिकांच्या समस्यांबाबत चर्चा झाली.

शैक्षणिक वर्षात होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात 200 जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाने कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांना नियमित सेवेत सामावून घेणे, एनआरएचएममधील कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍यांना वेतन मिळणे, 108 अ‍ॅम्ब्युलन्स सेवा व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये होमिओपॅथी वैद्यकांचा समावेश करणे, होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग वेतन लागू करणे आदी मागण्यांबाबत महाराष्ट्र कोैन्सिल ऑफ होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ.अजित फुंडे यांनी मागणी केली असल्याचे डॉ.रितेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

*