वेळेवर धान्य न देणाऱ्या रेशन दुकानांना तहसीलदरांनी ठोकले टाळे

0

नांदगाव : नांदगावचे तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांची गोरगरिबांना वेळवर धान्य न देणाऱ्या रेशन दुकानदारा विरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आला आहे. मनमाड मधील 5 तर तालुक्यातील अनेक रेशन दुकाने तहसीलदरांनी सील केली आहेत.

असून सणासुदीच्या दिवशी गोरगरीब गरजू रेशन दुकानावरून धान्य खरेदी करून सण साजरा करतात. मात्र काही दुकानदार सतत दुकाने बंद ठेवून लाभार्थीना धान्य पासून वंचीत ठेवत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

नंतर तहसीलदार देवगुणे यांनी अशा दुकानदारा विरुद्ध धडक मोहीम सुरू करून आज मनमाड शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन पाहणी केली. या वेळी  त्यांना पांच दुकाने बंद असल्याचे आढळून आल्या.

नंतर त्यांनी या दुकाने सील केली. नांदगाव तालुक्यातील काही गावात हीच परिस्थिती समोर आली असल्याने तेथे ही काही दुकाने सील करण्यात आली.

LEAVE A REPLY

*