Type to search

धुळे

वृध्द दाम्पत्यावर कोसळले घराचे छत

Share

कापडणे | काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी परिस्थिती आज दि.१८ सप्टेंबर रोजी पहाटे कापडण्यात पाहावयास मिळाली. अंगावर घराचे पूर्ण छत कोसळुनही तब्बल नव्वदीतील ब्राम्हणे दाम्पत्य यातून सहीसलामत राहिले, छत कोसळल्यानंतर शेजार्‍यांनी एकच धावपळ करत हिरामण ब्राम्हणे व रुखमाबाई ब्राम्हणे यांना ढिगार्‍याखालुन बाहेर काढले. जीवावर बेतले असतांना केवळ दैव बलवत्तर म्हणुन निभावल्याने, उपस्थितांनी व कुटुंबियांनी यावेळी सुटकेचा निःश्वास सोडला.

येथील कलाबाई यादव घोडे यांच्या घरात हिरामण आण्णा ब्राम्हणे (वय ९०) व रुखमाबाई हिरामण ब्राम्हणे (वय ८५) हे वयोवृध्द दाम्पत्य राहते. काल नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर हे दाम्पत्य झोपल्यानंतर उगवणार्‍या दिवसाने त्यांच्यावर चांगलेच संकट ओढवले. मध्यरात्रीनंतर हिरामण ब्राम्हणे यांना तब्बेतीचा त्रास होऊ लागल्याने गुडघ्यात डोके घालुन ते एका बाजुच्या भिंतीला लागुन बसले होते. छताचा काही भाग त्या भिंतीला टेकला गेल्याने काही प्रमाणात पोकळी निर्माण झाली व त्यांचे प्राण वाचले. सुर्देवाने ते खाटेवर झोपलेले नव्हते, नाहीतर छत त्यांच्या अंगावरच पडण्याची शक्यता होती. तर रुखमाबाई ब्राम्हणे या ज्या भागात झोपल्या होत्या त्या भागाचे छत कमी प्रमाणात पडल्याने सुर्देवाने त्याही बचावल्या.

आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही घटना झाल्यानंतर शेजार्‍यांनी व कुटुंबियांनी एकच धावपळ करत या वयोवृध्द दाम्पत्यास वाचवले. यातील हिरामण ब्राम्हणे यांना जबर मार लागल्याचे सामाजिक कार्यकर्ते भुषण ब्राम्हणे यांनी सांगितले. तलाठी विजय बेहरे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. गेल्या पंधरवाड्यात भिज पाऊस झाल्याने मातीची घरे भिजली असुन, बरीच घरे अजुन कोसळत आहेत. या पडलेल्या घरांची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!