विहिरीत फेकून नरबळी 

0

धुळे /लौकी, ता.शिरपूर येथे राहणारे आबा राघो पाटील (वय 55) आणि बापू राघो पाटील (वय 50) या दोघांच्या मालकीच्या शेतातील विहिरीचे पाणी टिकून रहावे म्हणून,

दोघांनी संगनमत करुन सुमारे 15 वर्षांपूर्वी होळीच्या दुसर्‍या दिवशी शिवा रामसिंग मोरे (भिल) (वय 28) याला विहिरीत ढकलून त्याचा खून केला होता.

याबाबत मयताची बहिण रोकडीबाई बुधा भिल हिने सदर गुन्ह्याची उकल करु नये म्हणून दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करुन तिला भरचौकात जीवंत जाळून टाकण्याची धमकी दिली.

याबाबत रोकडीबाई बुधा भिल यांनी दि.2 मे 2017 रोजी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरुन भादंवि 302, 504, 506 सह अनुसूचित जाती, जमाती कलम 3 (3) (10) प्रमाणे आबा राघो पाटील, बापू राघो पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*