विहिरीत पडलेल्या हरणास शेतकर्‍याकडून जीवदान

0

मनमाड| प्रतिनिधी-पाण्याच्या शोधात फिरत असताना पाणी पाहून विहिरीत पडलेल्या एका हरणाला शेतकर्‍यांनी दाखविलेल्या समय सुचकतेमुळे जीवदान मिळाल्याची घटना मनमाड पासून जवळ माळेगाव कर्यात येथे घडली. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्ना नंतर या हरणाला विहिरीतून बाहेर काढण्यात शेतकर्‍यांना यश आले. बाहेर पडताच हरणाने जंगलात धूम ठोकली.

मनमाड पासून १२ किमी अंतरावर असलेल्या माळेगावकर्यात शिवारात बाळासाहेब मिसर यांची शेती असून त्यात असलेल्या विहिरीला पाणी आहे. सध्या कडक उन्हाळा सुरु झाला असून तपमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नदी-नाले कोरडे पडू लागले. पाण्यासाठी वन्य प्राण्यांना भटकंती करावी लागत आहे.

एक हरीण पाण्याच्या शोधात फिरत असताना त्याला विहिरीत पाणी दिसले पाणी पाहून तहानलेल्या या हरणाने थेट विहिरीत उडी घेतली.

विहीरीत जास्त पाणी नसल्यामुळे हरीण बुडाले नाही पाणी पिल्यानंतर बाहेर कसे पडायचे हे या हरणाला उमजत नव्हते त्यामुळे त्याने ओरडायला सुरुवात केली त्याचा आवाज ऐकून जवळच शेतात काम करीत असलेले रवी उगले यांनी विहिरीकडे धाव घेतली त्यात हरीण पाहून त्यांनी शेतात असलेल्या घरात जाऊन दोरी आणली त्यांच्या मदतीला आलेले वाल्मिक सोनवणे, भाऊसाहेब माळी हे दोन तरुण विहिरीत उतरले हरणाला दोरखंडाने बांधून बाहेर काढले.

याकामी त्यांना रवी उगले, राहुल उगले, गणेश पवार यांनी ही मदत केली. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर हरणाने जंगलात धूम ठोकली.

LEAVE A REPLY

*