विहितगावला त्याने कापला तलवारीने केक ; वाढदिवस पोलीस कोठडीत

0

नाशिकरोड : काल मध्यरात्री विहितगाव येथील एका दलालाने नियम धाब्यावर ठेवत वाढदिवसाला धारदार तलवारीने केक कापल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे फोटोही व्हायरल झाले, त्यानंतर उपनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तलवारीने केक कापणे चांगलेच भोवले असून पोलिसांनी दोघांना बेड्या घातल्या आहेत. विहितगाव येथील नदीम शेख आणि त्याचा साथीदार सलीम पटेल अशी दोघांची नावे आहेत.

यातील नदीम शेख याचा आज वाढदिवस आहे. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांने त्याच्या मित्रांसह वाढदिवसाचा केक धारदार तलवारीने कापल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

दोघांवर उपनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून  दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यामुळे त्याचा वाढदिवस आता थेट पोलीस कोठडीत होणार आहे.

LEAVE A REPLY

*