विसापूर तलावासह, कुकडी कालवा परिसरात जमावबंदी

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- कुकडी कालव्याचे आवर्तन दिनांक 25 एप्रिल रोजी सोडण्यात आले असून कुकडी डावा कालव्याचे आवर्तन केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच सोडण्यात आले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात पाणी असल्याने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्यावर जमावबंदी लागू करण्यात आली असून विसापूर तलावात पाणी सोडले असल्याने आणि विसापूर मधील सोडण्यात आलेले हे पाणी पिण्यासाठी संरक्षित करण्यात आले असल्याने या पाण्याचा उपसा शेतीसाठी होऊ नये यासाठी विसापूर तलावच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
कुकडी कालव्याचे आवर्तन केवळ पिण्यासाठी न देता या आवर्तनातून पाणी शेतीला आणि फळबागांना मिळावे अशी मागणी तालुक्यातील शेतकरी आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली असताना श्रीगोंद्यात शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन झाले तर आ . राहूल जगताप यांनी कुकडी कालव्यात बसून चार दिवस आंदोलन केले यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनात त्यांना पाणी काही उद्धभवमध्ये सोडण्याचे आश्वासन मिळाले. यानंतर पाणी खाली कर्जत आणि जामखेडकडे गेले आहे .या आश्वासनावर आणि पाणी टेल टू हेड असल्याने अजून या पाणी मिळण्यावर श्रीगोंदा तालुक्याचा विश्वास असल्याने अजून पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली नाही याच वेळी महसूल विभागाने जमावबंदी लागू केली आहे .
श्रीगोंदा तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलनाची सुरुवात होणार आहे . पहिले काही आंदोलन झाली आहेत यात श्रीगोंद्याला पाणी मिळाले नाही तर खाली पाणी जाऊ देणार नाही अशी ही भूमिका नेत्यांनी घेतली असल्याने पाण्याबाबत तीवर आंदोलनाची सुरुवात होण्यापूर्वी महसूल विभागाने हा आदेश लागू केला आहे.

 

येथे आहे जमावबंदी…
याआदेशात कुकडी डावा कालवा पारनेर तालुक्यात 26 किमी ते 55 किमी अळकुटी,जवळा 56 किमी तेपाडळी रांजणगाव 90 किमी, श्रीगोंदा तालुक्यात येवती 91 किमी ते एरंडोली 127 किमी, 128 किमी कोळगाव ते वडाळी 140 किमी, 141किमी वडाळी ते 155किमी तांदळी पर्यंत, पुढेआढळगाव 155 किमी ते 210 किमी पर्यंत कालव्यावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून या कालव्याच्या दोनही बाजूस 200 मीटर अंतरावर हा आदेश लागू आहे. तसेच विसापूर तलावात सोडण्यात आलेले पाणी अनधिकृत रित्या उपसा होऊ नये यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*