विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना

0

विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते, नाटककार मोहन जोशी यांना जाहीर करण्यात आले आहे.

हा पुरस्कार अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दिला जातो. येत्या 5 नोव्हेंबररोजी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्याहस्ते हे पदक त्यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. कराळे म्हणाले की, प्रतिवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणा-या श्रेष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते.

LEAVE A REPLY

*