Type to search

विश्वचषक संघात ‘फास्ट बॉलरची कमतरता- गंभीर

क्रीडा

विश्वचषक संघात ‘फास्ट बॉलरची कमतरता- गंभीर

Share
मुंबई । काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषका-साठी भारतीय संघाला एका जलदगती गोलंदाजांची गरज आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांना आणखी सहकार्‍याची आवश्यकता असल्याचे मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर राजकारणात नशीब आजमावणार्‍या गौतम गंभीरने विश्वचषकातील संघनिवडीवर टिप्पणी केली. संघात एका जलदगती गोलंदाजांची उणीव असल्याचे तो म्हणाला. हार्दिक पंड्या आणि विजय शंकर हे उणीव भरून काढतील, असे कोणाला वाटत असल्यास त्याबाबत मी साशंक आहे, असे तो म्हणाला.

भारताच्या या संघामध्ये एका प्रतिभावंत वेगवान गोलंदाजांची कमतरता आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे तीन गोलंदाज उत्तम आहेत. पण त्यांना आणखी एका वेगवान गोलंदाजाच्या सहाय्याची गरज आहे. भारतीय संघात हार्दिक पांड्या आणि विजय शंकर हे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत जे वेगवान गोलंदाजी करू शकतात. पण त्यांच्या कामगिरीबाबत मी थोडा साशंक आहे. कारण शेवटी संघात कोणते 11 खेळाडू खेळतात यावर संघाची सगळी भिस्त असते, असे गंभीर म्हणाला

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!