विशेष प्रोएक्टीव्ह ऑपरेशन : काश्मीरमध्ये लष्कराने केला 13 दहशतवाद्यांचा खात्मा

0

भारतीय लष्कराने 96 तासांत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली.

पाकिस्तानातून काश्मीर खोऱ्यात होणारी घुसखोरी भारतीय लष्कराने उधळली.

विशेष प्रोएक्टीव्ह ऑपरेशन करत लष्कराने 13 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी दिली.

लष्कराने या दहशतवाद्यांकडून स्फोटक आणि ज्वलनशील साहित्य, शस्त्र आणि दारुगोळाही जप्त केला.

भारतीय लष्कराद्वारे नियंत्रण रेषेवरुन नियमित तपास अभियान सुरु असतो. यादरम्यान माचिल, गुरेज, नौगाम आणि उडी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.

LEAVE A REPLY

*