विवेक ओबेरॉयकडून सुकमा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबांना फ्लॅट

0

अभिनेता अक्षय कुमार नेहमीच शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे सरसावत असताना, आता त्याच्यापासून प्रेरणा घेत विवेक ओबेरॉयने देखील मदत करायचे ठरवले आहे.

गेल्या महिन्यात छत्तीसगडमधील सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या २५ सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबांना विवेक ओबरॉयनं हक्काचे छत्र दिलंय.

कर्म इन्फ्रास्ट्रक्चर या त्याच्या कंपनीतर्फे सुकमातील शहिदांच्या कुटुंबीयांना ठाण्यात २५ फ्लॅट देण्यात आलेत.

नक्षली हल्ल्यात आपले वडील, मुलगा, पती गमावलेल्या कुटुंबांसाठी हा मोठा आधारच ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*