विवेकानंद प्रतिष्ठान स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्पर्धा

0

जळगाव । विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये राष्ट्रीय हरीत सेना अंतर्गत पर्यावरण पूरक गणपती बनविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत माध्यमिक विभागातील इ. 5 वी ते 10 वी च्या सुमारे 120 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

बाजारातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींमुळे होणारे प्रदुषण व पर्यावरणाचा र्‍हास थांबण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी व त्यासोबतच आपण बनविलेल्याची गणेशमुर्तीची स्थापना आपल्या घरी करावी, सौंदर्य हे मुर्तीत नसून आपल्या मनात असते ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविने यादृष्टीने शाळेतर्फे हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी कलाशिक्षक दत्तात्रय गंधे, मनिष बारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व विद्यार्थीनिंनी आकर्षक अशा गणेशमुर्ती तयार केल्या,

तसेच शाळेच्या माध्यमातून यंदाही कलाशिक्षक गंधे यांनी पर्यावरणपूरक शाडू मातीची सुबक मुर्ती तयार केली असून त्याच प्रेरणेने मुलांनीही उत्कृष्ट मुर्त्या बनविण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेचे परिक्षण रविंद्र भोईटे यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यामध्ये गट क्रमांक 1- 5 वी ते 7 वी या गटात इयत्ता सहावीची अनुष्का सागर सनस, इयत्ता 7वीची अमिन तडवी, इयत्ता 5वीची सिध्दी निंबाळकर,

तर गट क्रमांक 2 मध्ये 8 वी ते 10 वी गटात इयत्ता 10वीची रोशन काठपाल, इ.9वी ची आदिती बोरसे, इ. 8वीतील दिव्या नितीन पाटील, उत्तेजनार्थ- सार्थक टेकावडे अशी विजेत्या स्पर्धकांची नावे आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, समन्वयक गणेश लोखंडे, हरीत सेनेच्या शुभदा नेवे यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

*