विविध मागण्यांसाठी बँक कर्मचार्‍यांचे आंदोलन जिल्ह्यात ६०० कोटींचे व्यवहार ठप्प

0

जळगाव |  प्रतिनिधी :  नोटबंदीच्या काळात बँकेतील कर्मचार्‍यांनी अतिरिक्त केलेल्या कामाचा मोबदला मिळणे, अकराव्या वेतन कराराची त्वरीत अंमलबजावणी करावी तसेच केंद्र सरकारच्या नियमानुसार अनुकंपावर नोकर भरती करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स द्वारा स्टेट बँक ऑफ स्टाफ युनियनतर्फे देशभर एकदिवसीय बँक बंद ठेवण्याचे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २०० राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी  झाल्यामुळे जवळपास ६००  कोटींचे व्यवहार ठप्प झाले.

बँकांमध्ये कर्मचार्‍यांना होणार्‍या समस्या यासह विविध मागण्यांसाठी देशभरात बँकींग संघटनेकडून संप पुकारण्यात आला होता. दरम्यान आज शहरात भारतीय स्टेट बँकेच्या मुख्यशाखेजवळ युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स द्वारा स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन जळगाव युनिटतर्फे आंदोलन करण्यात आले होते.

दरम्यान शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.  आंदोलनात जिल्हाभरातून सुमारे ५०० च्यावर अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्यांना सुरेश तायडे, बी.के.कोतकर यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर सुर्वे यांनी कर्मचार्‍यांच्या समस्या मांडल्या.

संप यशस्वितेसाठी लिलाधर रायसिंग, पुरुषोत्तम चव्हाण, देवेंद्र नाईक, रणजित मराठे, रतन चव्हाण, प्रतिभा जाजू, रंजना पाटील, विजया देसले आदी उपास्थित होते.

या आहेत मागण्या

गॅ्रच्युयटी फंडाची सिलींग दूर करावी, अकरावा वेतन कराराची त्वरीत अंमलबजावणी करावी, केंद्रीय सरकारच्या नियमानुसार अनुकंपा म्हणून नोकरभरती सुरु करावी, पाच दिवसांचा आठवडा धरला जावा, अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची नवीन रिक्रुटमेंट करावे, थकीत कर्जदारांवर कडक कारवाई करावी तसेच नोट बंदिच्या काळात सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला मिळावा, ग्रच्युईटीला प्राप्तिकरातून सवलत मिळावी तसेच निवृत्ती नंतर रजांचे पैसे मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी संप पुकाराला होता.

बँकींग व्यवहार ठप्प

बँकेतील कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या एक दिवशीय संपामुळे सर्व बँकींग व्यवहार ठप्प झाले होते. त्यामूळे ग्राहाकांना नाहक त्रास सहन करावा लागला तसेच बँकेतीच्या ६०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते.

एटीएम बंदमुळे ग्राहकांचे हाल

बँक कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे एटीएम मध्ये पैसेच नव्हते. त्यामुळे शहरातील दोन तीन एटीएम सोडले तर काही ठिकाणी पैसे नसल्याने एटीएम बंद होते. तर एटीएम शोधण्यासाठी नागरींना चांगलीच कसरत करावी लागली तसेच  सुरु असलेल्या एटीएम वर पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

*