विविध कार्यक्रमांनी प्रवेशोत्सव साजरा – Photo Gallery

0

कुरखळी शाळेत पुस्तकांचे वाटप

आज दि. 15 जून रोजी जि.प.मराठी शाळा कुरखळी येथे प्रभात फेरी काढून शा.व्य.समिती सदस्यांसह शिक्षकवृंदानी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गुलाबपुष्प व खाऊचे वाटप करून स्वागत केले.
यानंतर शाळेत आयोजित केलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. वत्सलाबाई भिल ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्या सौ.संगीताताई मोरे, उपसरपंच सौ. यमुनाबाई भिल, ग्रा.पं.सदस्य सौ. मंडाबाई भिल, अवधूत मोरे, पुरुषोत्तम कोळी, अशोक धनगर, पोलीस पाटील वसंत धनगर, ललित राजपूत, आत्माराम कोळी, माजी विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाठ्यपुस्तक वाटप- कार्यक्रमात सुरुवातीला इ.1 लीच्या नवोगत विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प व खाऊ वाटून सत्कार करण्यात आला नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
मोफत शालेय साहित्य वाटप- पार्थ व हर्षल यांच्या स्मृती प्रित्यर्थ इयत्ता 1 ली ते 4 च्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्र संचलन सौ.योगिता नेरकर यांनी केले तर अवधूत मोरे, योगेश्वर मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक
टेकवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांची बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणूक काढुन, खाऊ व मिष्ठान्न भोजनासह आनंदोत्सवच साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच संजय धनगर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोतिलाल पटेल, उपाध्यक्ष शांतिलाल भलकार, सदाशिव वाडीले, श्रीकृष्ण वाडीले, दिलीप ठाकूर, संतोष ढोले, अतूल पाटील, शरद पाटील, सारीका वाडीले, कलाबाई पारधी व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत नवागतांचे वाजत गाजत बैलगाडीतून गावातून मिरवणूक व प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले व पोषण आहारात मिष्ठान्न दिल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडत होता. शाळेचे मुख्याध्यापक बी.आर.महाजन यांनी प्रास्तविकातून लवकरच शाळा डिजीटल करण्याचा मानस व्यक्त केला, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रुपेश कुलकर्णी यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी किशोर सोनवणे, जितेंद्र करंके, दिपक महाजन, बी.एल पावरा, एस.जे.सोनार, अभिजीत कोळी यांनी सहकार्य केले.

वाघडी शाळेत गुणवंतांचा सत्कार
वाघाडी येथील ब.ना. कुंभार गुरुजी विद्यालयात विद्यार्थींचा प्रवेशोत्सव, पुस्तक वाटप व इयत्ता दहावीत गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निंबा बापूजी माळी होते. यावेळी इ. 10 वीत प्रथम द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शासनाच्या आदेशानुसार पहिल्या दिवशी विद्यार्थीनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इ.5 वी ते 8 वी च्या विद्यार्थीनींना मोफत पुस्तकांचे वाटप निंबा बापूजी, गोपाल दाभाडे, कीशोर नाना व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख एल. एस.पवार, पर्यवेक्षक एस.पी.बोरसे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इ उपस्थित होते. सुत्रसंचालन देवरे यांनी केले.

विद्यार्थ्यांची टम टम गाडीतून सवारी
येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा, शिरपूर शाखेत शाळा शुभारंभ अर्थात शिक्षणोत्सव सोहळा जल्लोषात संपन्न झाला. उन्हाळी सुट्टी नंतर आज सर्वत्र शाळा सुरु झाली.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लक्षणिय होती. शाळा शुभारंभ प्रसंगी सौ.संगीताताई देवरे, बांधकाम सभापती. सौ.आशाताई बागुल, शिक्षण मंडळ सभापती, सौ.रंजनाताई सोनवणे, नगरसेविका, शिवनप शिरपूर, डॉ.उमेश शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती आर.डी. शुक्ल माजी मुख्याद्यापक, मुख्याद्यापक गणेश साळूंके, मनोहर वाघ अधिक्षक शालेय पोषण आहार प.स.शिरपूर, दिलीप बोरसे, अमोल पाटील, अमोल सोनवणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी नवागत बालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सकाळी विद्यार्थ्यांना टम टम गाडीतून सवारी करण्यात आली. शासनाकडून प्राप्त मोमत पाठयपुस्तक वितरण करण्यात आले. शाळेतील वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरी करण्यात आले. अमोल पाटील यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रम प्रास्तविक मुख्याध्यापक सी.डी. पाटील यांनी सादर केले.
सौ. संगीता देवरे व मनोहर वाघ यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र माळी.यांनी केले. आभार गजेंद्र जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामोडे येथे पाठ्यपुस्तकांचे वाटप
येथील साने गुरुजी प्राथमिक शाळेत पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
सामोडे येथे दि.15 जून रोजी शाळा शुभारंभप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गावात प्रभातफेरी काढून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थी शाळेत मोठ्या संख्येने उपस्थित झाले व सकाळी दहा वाजता पुस्तक वाटप कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थी, पालक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ यांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दयाराम काशिराम शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सुनीता भदाणे, उपशिक्षिका मनिषा भदाणे, उपशिक्षक ज्ञानेश्वर घरटे व कुणाल बेनुस्कर यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बोराडीत गुणवंतांचा गौरव आणि पुस्तकांचे वाटप
बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात विद्यार्थीनींचा प्रवेशोत्सव, पुस्तक वाटप व इयत्ता दहावीत गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे होते. यावेळी इ. 10 वीत प्रथम अश्विनी सोनवणे, द्वितीय चैताली पवार, तृतीय वर्षा बावा यांचा सत्कार करण्यात आला. शासनाच्या आदेशानुसार पहिल्या दिवशी विद्यार्थीनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इ.5 वी ते 8 वी च्या विद्यार्थीनींना मोफत पुस्तकांचे वाटप शशांक रंधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख डी.ए. बोरसे, पर्यवेक्षक एस.आर. बडगुजर, सी.एम. कुलकर्णी, एन.एम. सोनवणे, सौ.वर्षा पाटील, आर. व्ही. मेटकर, टी.टी. ढोले, जे.पी.पावरा, एस. ए.अहीरे, सी.एस.बडगुजर, निरज निकम इ.उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश भामरे यांनी केले.

पानाखेड शाळेतर्फे विद्यार्थ्यांची मिरवणूक
जि. प. शाळा पनाखेड या शाळेत शाळा शुभारंभ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गावाच्या पंचक्रोशीतुन सर्व विद्यार्थ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. नवागत विद्यार्थ्यांची बैलगाडीतुन मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी पुस्तकदिंडीचे ही आयोजन करण्यात आले होते. सरपंच, शा.व्य.स.अध्यक्ष, ग्रा. पं.व शा.व्य.स.पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वाटप, गोड पदार्थ वाटप, शिक्षकांचा सत्कार, स्वयंपाकी ताईंचा सत्कार व मित्रा अ‍ॅप्सचे उदघाटन इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले. इ.6वीचे वर्गशिक्षक यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शंकरपाळे व पंतजलीच्या बिस्कीटांचे वाटप केले.

 

LEAVE A REPLY

*