विलास शिंदे शिवसेना गटनेते

0

नाशिक : महापालिका निवडणुकीत प्रभाग 10 मधील नवनिर्वाचित नगरसेवक विलास शिंदे यांची महापालिका शिवसेना गटनेते पदी निवड करण्यात आल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना 35 जागा जिंकत दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणुन समोर आली आहे. यात शिवसेनेने नाशिकरोड व नवीन नाशिक विभागात मोठी कामगिरी केली आहे.

तर संपुर्ण शहरात एकमेव अशा सातपूर विभागात प्रभाग 10 मधील 4 जागा जिंकण्याची मोठी कामगिरी केली शिवसेनेने केली आहे. याठिकाणी विलास शिंदे यांच्या नेतत्वाखाली चारही जागा जिंकण्यात यश आले आहे.

शिंदे हे सलग दुसर्‍यांना सेनेकडुन विजयी झाले आहे. शिंदे यांनी गंगापूर रोड चौपदरीकरण व रस्त्यातील धोकादायक झाडे काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यानंतर अनेक प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी महासभेत आवाज उठविला आहे. या कामांची दखल म्हणुन शिंदे यांनी महापालिका गटनेते पदावर निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*