विरोधी पक्षातर्फे उपराष्ट्रपदीपदाचे उमेदवार म्हणून गोपालकृष्ण गांधी

0
संसदेत आज उपराष्‍ट्रपतीपदाच्‍या उमेदवार निवडीसाठी काँग्रेससहीत इतर विरोधी पक्षांची बैठक झाली.
बैठकीत गोपाळकृष्‍ण गांधी यांच्‍या नावावर सर्व पक्षांचे एकमत झाल्‍याची माहिती आहे. बैठकीनंतर याची घोषणा केली जाण्‍याची शक्‍यता आहे.
भाजपतर्फे उपराष्‍ट्रपतीपदाच्‍या उमेदवाराची घोषणा 13 किंवा 14 जुलैला होऊ शकते, अशी शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे.
  • कोण आहेत गोपाळकृष्‍ण गांधी?
    गोपाळकृष्‍ण गांधी हे महात्‍मा गांधीचे नातू आहेत. राष्‍ट्रपतीपदासाठीदेखील त्‍यांचे नाव चर्चेत होते.
    गोपाळकृष्‍ण गांधी हे 2004 ते 2009 दरम्‍यान पश्चिम बंगालचे राज्‍यपाल होते. ते अशोका विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख आहेत तसेच दक्षिण आफ्रीकेत भारताचे राजदुत म्‍हणूनही त्‍यांनी कार्य केले आहे.
    गोपाळकृष्‍ण गांधी हे गांधी आणि आंबेडकर यांच्‍या विचारांचे अभ्‍यासक म्‍हणून ओळखले जातात.

LEAVE A REPLY

*