Type to search

क्रीडा

विराट-बुमराहला विश्रांती

Share

नवी दिल्ली । विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर 15 दिवसांनी भारतीय संघ वेस्ट इंडिज दौर्‍यावर रवाना होणार आहे. 3 ऑगस्टपासून भारताच्या विंडीज दौर्‍यात 3 टी-20, 3 वन-डे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहेत. या दौर्‍यासाठी कर्णधार विराट कोहली आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देणार आहे.

विराट आणि जसप्रीतला टी-20, वन-डे मालिकेत विश्रांती दिली जाईल हे नक्की आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपासून विराट सतत क्रिकेट खेळतो आहे. बुमराहवर अतिक्रिकेटमुळे येणारा ताण हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. मात्र हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात असतील. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली. याचसोबत बीसीसीआय आणखी काही खेळाडूंनाही विश्रांती देण्याच्या तयारीत आहे. सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत धडक मारेल असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त झाला आहे.

मात्र भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचला तर 14 जुलैपर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन विंडीज दौरा आखला गेला आहे, असं बीसीसीआयच्या अधिकार्‍याने स्पष्ट केलं. विराट आणि बुमराहला वेस्ट इंडिज दौर्‍यात विश्रांती मिळाली तर त्यांच्या जागी एकदिवसीय संघामध्ये खलील अहमद आणि मयंक अग्रवा यांनी संधी मिळू शकेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!