विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेत बाहेती महाविद्यालय- के.आर.कोतकर अजिंक्य
Share

जळगाव। वि.प्र. – क्रीडा व युवक सेवा पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय, मनपा, जळगाव यांच्या सयुंक्त विद्यमाने व जिल्हा सॉफ्ट बॉल संघटनेच्या सहकार्याने नाशिक विभागीय 19 वर्षाआतील गट मुले व मुलीच्या स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झाल्या.यामध्ये मुले विभागात बाहेती महाविद्यालय जळगाव तर मुलीमध्ये के.आर. कोतकर महाविद्यालय,चाळीसगाव अजिक्य ठरले.
मुले विभागात अॅड.बाहेती महाविद्यालय,जळगाव विजयी विरूध्द कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय लासलगाव 3-1 होम रन, तृतीय स्थानी पुरूषोत्तम ईग्लीश स्कुल, नाशिक, मुली विभाग-के.आर. कोतकर महाविद्यालय चाळीसगाव विजयी विरूध्द स्वामी विवेकानंद महाविद्याल जळगाव 10-7 होम रन विजयी संघाचे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, प्रशांत जगताप, अरूण श्रीखंडे, शंकर मोरे, गोरख सुर्यवंशी, खुशाल देशमुख यांनी केले.या स्पर्धेसाठी पंच म्हणून कुणाल येवले,कल्पेश कोल्हे, पवन म्हस्के, आकाश महाजन,केतन कोल्हे यांनी काम पाहिले.