विधानसभेत आजही गोंधळ; सभागृह तहकूब

0

गुरूवारी सकाळी सत्ताधारी पक्ष सभागृहात उपस्थित नसल्याने उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी एक तासासाठी सभागृहाची बैठक तहकूब केली.

विधानपरिषदेत बुधवारी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी सदस्यांनी घातलेला गोंधळ आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि कामकाजावर घातलेला बहिष्कार यामुळे सभागृहाच्या कामकाजात तिढा निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी सत्ताधारी-विरोधी पक्षात मतभेद होऊन विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच कामकाज बंद पडणे हा एक दुर्दैवी प्रकार असल्याचे मत व्यक्त केले.

तर काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते शरद रणपीसे यांनी सत्ताधारी पक्षाचे सदस्य व मंत्री उपस्थित असल्याशीवाय सभागृह चालविणे शक्य होणार नसल्याचे मत व्यक्त केले.

उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षच उपस्थित नसल्याने कामकाज सूरू करणे शक्य नसल्याचे सांगत एक तासासाठी सभागृह तहकूब करण्यात येत असल्याचे जाहिर केले.

LEAVE A REPLY

*