Type to search

नंदुरबार

विद्या इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये जन्माष्टमी उत्सव साजरा

Share

नंदुरबार | नंदुरबार तालुक्यातील पथराई येथील विद्या इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहिहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या खजिनदार सौ.विद्या चंद्रशेखर पाटील ह्या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्कुलचे प्रिन्स्पिल रहीम शेख यांनी श्रीकृष्ण जीवनावर आधारीत प्रसंग व माहिती दिली. दहिहंडीपूर्वी गरबा नृत्याने मुलांचा उत्साह आनंद द्विगुणीत झाला. सूत्रसंचालन अर्चना मॅडम यांनी तर आभार श्रीमती शितल यांनी मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!