Type to search

धुळे

विद्यावर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा

Share

धुळे | महर्षी व्यास यांना वंदन करण्याचा दिवस म्हणजे व्यास पौर्णिमा. त्यांनी लिहिलेले महाभारत हा ग्रंथ हिंदू संस्कृतीसाठी पुजनीय आहे, आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचे उत्तर तुम्हाला या ग्रंथात मिळेल. असे प्रतिपादन प्रा. वैशाली पाटील यांनी केले. त्या शहरातील विद्यावर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात बोलत होत्या.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यावर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रीय समुपदेशन व्हावे या उद्देशाने ही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी.एस.सुर्यवंशी हे होते. प्रमुख पाहुणे प्रा. पंजाबराव व्यास, महाविद्यालयातील कला सांस्कृतिक प्रमुख प्रा. वंदना चौधरी हे तर प्रमुख वक्त्या म्हणुन प्रा. वैशाली पाटील या उपस्थित होत्या.

मुला मुलींमधील न्युनगंड बाजुला सारण्यासाठी यावेळी कौन्संलीग करण्यात आले.मुला मुलींचे कौन्सलींग करतांना प्रा.पाटील म्हणाल्या की, आपल्या अपयशाचे धनी हे फक्त आपणच असतो, माणुस स्वतः बद्दल जो विचार करतो तेच तो बनत असतो. परिस्थिती माणसाला घडवत नाही तर माणुसच स्वतःच्या विचाराने परिस्थिती घडवत असतो असे त्या म्हणाल्या. यावेळी आयुष्यात ध्येय, सकारात्मकता, नियोजन, कष्ट यांचे महत्त्व त्यांनी विषद करुन विद्यार्थ्यांच्या कल्पकता व प्रेरणेला प्रोत्साहन दिले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डि. एस. सुर्यवंशी यांनी गुरु आणि शिष्य या शब्दाचा अर्थ विषद केला. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले, तसेच तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. वंदना चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. उज्ज्वला जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. बबिता वाडिले, प्रा. वर्षा खोपडे यांचे सहकार्य लाभले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!