विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत – Photo Gallery

0

नंदुरबार । दि.15 । प्रतिनिधी- जिल्ह्यातील नवागत विद्यार्थ्यांचे वाजतगाजत शाळेत स्वागत करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

अनुदानित आश्रमशाळा बिलबारा, ता.नवापूर
नवापूर । प्रतिनिधी-
महिन्याच्या उन्हाळी सुटीला पूर्णविराम मिळून नवीन शैक्षणिक वर्षाला गुरुवारी सुरुवात झाली. शाळेत येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचा हा पहिला दिवस आठवणीतला दिवस म्हणून जपता यावा यासाठी नंदुरबार आदिवासीबहुल जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील आदिवासी सेवा सहायक व शिक्षण प्रसारक संस्था संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बिलबारा, येथे पारंपरिक पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. बैलगाडीत पहिली व नवगत विद्यार्थ्यांना बसवून मिरवणूक काढण्यात आली. शैक्षणिक जनजागृतीसाठी गावात रैली करण्यात आली. यावेळी विद्यार्थी शिक्षक व पालक, सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नंदुरबार आदिवासीबहुल जिल्ह्यातील शासकीय,अनुदानित जिल्हा परिषद मराठी शाळांच्या वतीने प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे दणक्यात स्वागत केले. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळांना आजपासून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटामुळे पहिल्याचदिवशी सर्व शाळेतील शिक्षकांनी स्वत: शाळेच्या प्रवेशद्वारात उभे राहून विद्यार्थ्यांचे गुलाब फुल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेतील प्रत्येक वर्ग, नोटीस बोर्ड, वर्गातील फळे सजविण्यात आले होते.

आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्पधिकारी निमा अरोरा यांनी प्रत्येक आश्रम शाळेत प्रकल्पाचा एक प्रतिनिधी पाठवून वेगळ्या पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा केला. कार्यक्रमाचे फोटो व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर टाकण्यात आले. कधी नव्हे एवढा मोठा प्रतिसाद शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत पहिल्यांदा पाहावयास मिळाला या कार्यक्रमाला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.शाळेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शाळेची इमारत फुग्यांनी सजविली होती, प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपआपल्या वर्गातल्या मुलांचे स्वागत केले. काही शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळ, शिक्षकांशी ओळख करण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यालयात शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी पुस्तके आणि खाऊ यांचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच दप्तरांचे वाटप करण्यात आले. सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला. शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.

स्वा.सै.श्री.गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर, नंदुरबार
येथील स्वा.सै.श्री.गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिरात शाळा प्रवेशोत्सव ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांच्या मिरवणूकीने उत्साहात साजरा करण्यात आला. यात गुलाबपुष्प व चॉकलेट देवून पहिलीत प्रवेशीत नवागतांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ.नंदा शाह व प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक शिक्षण समितीचे सदस्य डॉ.अनिलभाई देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शालेय परिपाठ घेण्यात आला. तयात मराठी, इंग्रजी, हिंदी गाणे सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय क्रमिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. पोषण आहारात व्हेज पुलाव व शिरा वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना सौ.नंदा शाह यांनी केली. सुत्रसंचलन फकीरा माळी, तुषार सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन भद्रेश त्रिवेदी यांनी केले. सतीष पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

नगरपालिका शाळा क्र.1, 3 व 14, नंदुरबार
नंदुरबार येथील शहीद शिरीषकुमार मेहता प्राथमिक विद्यामंदिर नगरपालिका शाळा क्र.1, 3 व 14 यांच्या संयुक्त विद्यामाने नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासन अधिकारी आर.बी. पाटील व प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ गणेश तांबोळी होते. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू पाडवी, उपाध्यक्ष सौ.मीनाबाई बारी व इतर सदस्य, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते नवागतांचे गुलाबपुष्प व फुगे देवून त्यांचे स्वागत करण्यात आले व नंतर सर्व हजर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासोबत मिष्टान्न देवून तोंड गोड करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न.पा. शाळा क्र.1चे मुख्याध्यापक रणजीत नाईक, शाळा क्र.3 चे मुख्याध्यापक फिलीच मावची, शाळा क्र.14 मे मुख्याध्यापक श्रीमती मन्सुरी सुमैय्या, उपशिक्षक पराग पाटील, आशिष जैन, सुजित पांडे, मयुर सूर्यवंशी, श्रीमती प्रियंका खैरनार, शर्मिला करंजावणे, मोहम्मद अजहर, श्रीमती माया सोनवणे यांनी प्रयत्न केले.

सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिर, नंदुरबार
सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिरात नगरपालिका प्राथमिक शाळा क्र.4 येथे नवीन शैक्षणिक वर्ष सन 2017-18 च्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत व पुस्तके वाटप कार्यकम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी आर.बी. पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती अरूणा सोनवणे होत्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या व पालकांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली व प्रत्यक्ष बालकांच्या घरी जावून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.बी. पाटील प्रशासनाधिकारी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते इयत्तानिहाय उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक दासू कोकणी, माता-पालक संघातील सदस्या श्रीमती अरूणा सोनवणे, सकूबाई पाडवी, श्रीमती पूनम पिंगळे, श्रीमती सुनिता ठाकरे, श्रीमती रेखाबाई पाडवी, श्रीमती गीता वळवी, श्रीमती रायाबाई माळचे, श्रीमती लक्ष्मी कीर, श्रीमती पुष्पा सुरवाडे, श्रीमती संगिता सोनवणे, श्रीमती कमलबाई चित्ते, श्रीमती सुनिता पवार, श्रीमती सुमन सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शिरीष पवार, निशा सोनवणे, श्रीमती अर्चना गावीत यांनी केले तर सुत्रसंचालन निशा सोनवणे यांनी तर आभार श्रीमती अर्चना गावीत यांनी मानले.

श्री काकासाहेब हिरालाल चौधरी प्राथ.विद्यामंदिर, नंदुरबार
हिरा प्रतिष्ठान संचलित श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशुविहार यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील पहिला दिवस नवीन विद्यार्थ्यांची बैलगाडीवर मिरवणूक काढून तसेच गुलाबपुष्प व केक कापून साजरा करण्यात आला. हा अतिशय नाविण्यपूर्ण उपक्रम आहे असे मत जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अरूण पाटील यांनी आपल्या भाषणातून शाळेने आयोजीत केलेल्या नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार
नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल येथे शैक्षणिक वर्ष सन 2017-18 साठी इयत्ता पाचवीतील नवीन विद्यार्थीनींचे स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थीनींना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र सराफ यांनी पाठ्यपुस्तकांच्या वापराबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.परिक्षित मोडक, चेअरमन गिरीश खुंटे, सेक्रेटरी प्रशांत पाठक, कार्यकारिणी सदस्या सौ.प्राची कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य श्रीराम मोडक, राहुल पाठक, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.भारती सुर्यवंशी, पर्यवेक्षक नारायण भदाणे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमंत बोरसे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महेश भट, जितेंद्र पगारे, चंद्रशेखर चौधरी यांनी परिश्रम घेतले.

सरदार पटेल प्राथमिक शाळा
गुलाबाच्या सुवासिक फुलांनी सरदार पटेल प्राथमिक शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शालेय समितीचे चेअरमन अ‍ॅड.प्रभाकर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुशिला सोनवणे, संस्थेचे सदस्य रमण पाटील, शालेय समिती सदस्या सौ.मंगला गावीत, श्रीमती विमल मंडलीक, पवन परदेशी यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तक व मिष्ठान्न देवून स्वागत करण्यात आले.

स.म.श्री.अणासाो.पी.के. पाटील माध्यमिक विद्यालय
येथील स.म.श्री.अणासाो.पी.के. पाटील माध्यमिक विद्यालयात शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी याकरीता कोकणी हिल परिसरातून बँडपथकासह रॅली काढण्यात आली. व “पहिले पाऊल वृक्ष लावून” या संकल्पनेसह विद्यार्थ्यांच्या हस्ते तसेच हिरा प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक काकासाहेब हिरालाल चौधरी, सहा.वनसंरक्षक आर.एन. जेजुरकर, संस्थेचे सचिव रूपेश चौधरी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महेंद्र फटकाळ, एम.के. राजपूत, राजधर धनगर, दिलीप चौधरी, शब्बीर खाटीक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पुष्प देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिष्टान्न देवून सर्व शिक्षा अभियानांतर्गत योजनेतून पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक श्रीमती चेतना चौधरी, अनिल चौधरी, विश्वास गायकवाड, श्रीमती छाया मोरे, श्रीमती उज्वला चौरे, नितीन साळी, अमोल भदाणे, जितू चौधरी तसेच शिक्षकेतर कर्मचारी जितेंद्र चौधरी, रविंद्र चौधरी, शेखर पाटील, सुधाकर ठाकुर, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिर
चिनोदा ता.तळोदा । वार्ताहर-
तळोदा येथील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरात पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन तसेच त्यांचे औक्षण करुन वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखिया व सौ.सोनाबेन तुरखिया यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन कौतुक केले. तसेच मिरवणूकीचा समारोप मीरानगर येथे साईं बाबा मंदिरात दर्शन घेऊन त्या परिसरातच केक कापून व विद्यार्थ्यांना चॉकलेट, बिस्किट आदींचे वाटप करून करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका श्रीमती पी.एच. बागुल, संदिप चौधरी, देवेंद्र शिंपी, अरुण कुवर, मुकुंद महाजन, सागर सोजळ, संतोष पावरा, सचिन पाटील, श्रीमती रुखमणी, श्रीमती अर्चना पाडवी, राजेश मराठे, शैलेंद्र पाटील, समाधान मराठे आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शारदा प्राथमिक विद्यामंदिर, नंदुरबार
नंदुरबार येथील शारदा प्राथमिक विद्यामंदिर येथे आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातील नवागत विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.
मे महिन्याच्या सुटीत शिक्षकांनी परिसरात घरोघरी जावून केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्व दाखलपात्र मुलांच्या प्रवेशाचे काम दिनांक 5 जून ते 14 जून अखेर पूर्ण केले. शाळा व्यवस्थापन समिती व पालक सभा घेऊन सर्व नवीन प्रवेशीत तसेच जुन्या विद्यार्थ्यांना 15 जून रोजी पहिल्या दिवसापासून शाळेत पाठविण्याविषयी आवाहन करून शासकीय योजनेविषयी माहिती देण्यात आली व शिक्षणाचे महत्व समजावून सांगण्यात आले. आज दि.15 रोजी सकाळी परिसरातून सर्व नवीन प्रवेशीत तसूच जून्या विद्यार्थ्यांचे पालकांसह वाजत-गाजत मिरवणूक काढून शाळेत अत्यंत उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच शालेय पोषण आहारासोबत मिठाई वाटप करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संजय तवर, रामू नाईक, सुनिता पाटील, दिपक पाटील यांनी संयोजन केले.

के.डी. गावीत सैनिकी विद्यालय, नंदुरबार
नवीन शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी संचलित के.डी. गावीत सैनिकी विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयात संस्थेचे सचिव राजेंद्रकुमार गावीत, प्राचार्य व शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत आलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

उर्दू प्राथमिक शाळा, नंदुरबार
नंदुरबार येथील सय्यद इमाम बादशाह शिक्षण संस्था, नंदुरबार संचलित उर्दू प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी इयत्ता पहिलीतील बालकांचे जोरदार स्वागत करुन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
दि.15 जून म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत दरवर्षी शाळेत दाखल होणार्‍या बालकांचे स्वागत करण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार येथील सैय्यद इमाम बादशाह शिक्षण संस्था, नंदुरबार संचलित उर्दू प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी इयत्ता पहिलीत परिसरातील प्रवेशपात्र बालकांना प्रवेश देवून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सय्यद नईमोद्दीन व सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट व मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक खाटीक इमरान, शाळेतील शिक्षिका सैय्यद साजेदा, शेख नाजिया, शेख नुसरत, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कुलदिपक विद्यालय, झामणझर
आदिवासी ज्ञानपीठ नवापूर संचलित कुलदिपक माध्यमिक विद्यालय, झामणझर (ता.नवापूर) येथे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरपंच सुमा राया मावची व विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.बी.वाघ यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. तसेच नवीन प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.व्ही.बेहेरे यंनी केेले तर आभार पी.एम.नवरे यांनी मानले.

श्री शिवाजी हायस्कूल, नवापूर
नवापूर -श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्याल येथे या शाळेचा पहिल्या दिवशी इयता 5 वीतील नवोदित प्रवेश करणारे विद्यार्थाचे गुलाब पुष्प व मिष्ठान्न देऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले. सकाळी इयत्ता पाचवीत प्रवेश घेणारे नवागत विद्यार्थी यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा हस्ते शालेय पुस्तके विद्यार्थाना वाटप करून नंतर विद्यार्थाना मिष्टान्न भोजन देण्यात आले त्यानंतर शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आर.व्ही. पाटील, उपमुख्याध्यापक अनिल पाटील, उपप्राचार्य एस आर पहुरकर, पर्यवेक्षक प्रविण पाटील, विनोद पाटील,भरत पाटील, कमल कोकणी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते प्रसंगी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शालेय पुस्तकांचे वाटपही करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल सुनील लाड उपस्थित होते.

आईसाहेब सौ.सुरेखाताई गावीत अनुदानित आश्रमशाळा, कारेघाट
नवापूर । प्रतिनिधी- तालुक्यातील कारेघाट येथील माणिकरावजी विद्या प्रसारक संस्थेचे आईसाहेब सौ.सुरेखाताई माणिकरावजी गावीत अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कारेघाट येथे प्रवेशोत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन संस्था उपाध्यक्ष कुथ्या गावीत, कारेघाट सरपंच फत्तुबाई गावीत,तर विशेष उपस्थिती म्हणुन ए.अ.वि.प्रकल्प नंदुबार येथील भानुदास वसावे,उपसरपंच दिलीप गावीत हे होते.कार्यक्रमाची सर्व प्रथम विद्यार्थी-पालक मान्यवर मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहभागाने प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीत सुरवातीस आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाया ढोल,व शिबली चे नृत्यृ सादर करण्यात आले होते.नंतर कार्यक्रमात नवोगतांचे व त्यांच्या पालकांचे स्वागत पुष्पगुच्छ देवुन करण्यात आले,तसेच इयत्ता 1ली ते 10 वी पर्यतच्या विद्यार्थ्याना वहया,पुस्तक व गणवेश वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात संस्था उपाध्यक्ष कुथ्या गावीत,भानुदास वसावे,मुख्याध्यापक दिलीप गावीत,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सुञसंचसन शिक्षक संदिप चव्हाण यांनी केले तर आभार दिनेश एम.बिरारीस यांनी मानले.

सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळा, नवापूर
नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालित सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळेत शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी शहरातून विद्यार्थ्यांनी शिक्षणाची पालखी, प्रभात फेरी काढली. त्यानंतर नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक वितरीत करून शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शिरीषभाई शाह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सौ.मेघा हेमंत जाधव.माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, संस्थेचे सहसचिव शोएबभाई मांदा, श्रीमती शीला पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील व पालक उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक महेश पाटील, सूत्रसंचालन श्रीमती योगिता पाटील तर आभार श्रीमती माधुरी चित्ते यांनी मानले. यशस्वितेसाठी श्रीमती मनीषा भदाणे, मीना तांबोळी, करुणा पाटील, रेसा मावची यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*