विज्ञान-2च्या पेपरला 18 कॉपीबहाद्दर

0

नाशिक : दहावीच्या परीक्षेत सोमवारी झालेल्या विज्ञान दोनच्या पेपरला विभागातून 18 कॉपीबहाद्दर जाळ्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांवर नियमाप्रमाणे कॉपी केसेस करण्यात आल्या आहेत अशी माहिती परिक्षा विभागाने दिली आहे.

यात धुळे जिल्ह्यात सर्वात 8 कॉपीबहाद्दर पकडले. त्यात दुसाने गावातील एकाच केंद्रावर हे 8 कॉपी बहादर पकडण्यात आले. याशिवाय जळगाव जिल्हयात भुसावळ येथे 2 विद्यार्थ्यावर कॉपी केस करण्यात आली. नाशिक, मध्येही 8 कॉपी केसेस करण्यात आल्या. त्यात दिंडोरी येथे 2, मेाहाडी येथे 2 तर नांदगाव येथील केंद्रावर 4 जणांवर कॉपीकेसेस करण्यात आल्या.

दरम्यान कॉपी करताना पकडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत दहावीचे सर्वच महत्त्वाचे पेपर झालेले आहेत. आता केवळ विज्ञान, संस्कृत तत्सम पेपर शिल्लक आहेत. दरम्यान सुरुवातील सोशल मीडियावर बारावीचे पेपर फुटल्यानंतर परीक्षा विभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली. त्यानंतर सर्वच केंद्रावर सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली.

याशिवाय उपजिल्हाधिकार्‍यांनी शिक्षण विभागाची बैठक घेत त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संवेदनशील केंद्रावर पोलिसांसह अन्य सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. त्यामुळे कॉपी करणार्‍यांवर वचक बसून त्यांचे प्रमाणही आपोआप कमी झाल्याचे चित्र आहे.

परीक्षा संपेपर्यंत या सर्वच केंद्रावर सुरक्षा कायम राहणार असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*