विकास अनुभव व इच्छाशक्तीच्या जोरावर

0

नितीन औताडे ः शिवसेना उमेदवार सिमाताई औताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

 

पोहेगांव (प्रतिनिधी)- गेल्या तीन पिढ्या पासून कोपरगाव तालुक्यातील प्रास्तापित नेते मंडळी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर, निळवंडे व उजणी पाणी प्रश्‍नांच राजकीय भांडवल करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. तालुक्याच वाळवंट करणार्‍यांना साधा आपल्या गावांचा विकास करता आला नाही. त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये. जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करू नये. कारण सत्ता कोणाचीही असली तरी अनुभव व इच्छा शक्तीच्या जोरावर आपण निश्चितपणे विकास करू शकतो. एवढा आत्मविश्वास आमच्याकडे आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते नितीनराव औताडे यांनी केले.

 

 

चांदेकसारे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ. सिमाताई नितीनराव औताडे यांचा प्रचार शुभारंभ पोहेगांव येथील मयुरेश्वर मंदिरात श्रीफळ फोडून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे होते. नितिनराव औताडे म्हणाले, प्रत्येक निवडणूक वेगळी असते.

 

 

मागे झालेल्या चांदेकसारे गणातील उमेदवाराने घेतलेली आघाडी पाहून काही लोकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. शिवसेनेचे उमेदवार सौ. सिमाताई औताडे यांनी 2002 मध्ये महिला बालकल्याण समितीच्या सभापती असताना संपूर्ण गटात विकास कामे करून विकास काय असतो ते दाखवून दिले आहे. विकास आणि जनतेचे घेणे देणे नसणार्‍या काही मंडळींनी आपल्या शैक्षणिक संस्थेत गरीब व शेतकर्‍यांच्या मुलांची डोनेशन घेऊन लुट केली आहे. ही बाब दुर्दैवी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

राजेंद्र झावरे म्हणाले, तालुक्यातील इतर भागातील परिस्थिती वेगळी आहे. मात्र चांदेकसारे जिल्हा परिषद गटात काळे व कोल्हे यांना नितीनराव औताडे यांनी राजकारणात आणलेले उमेदवार द्यावे लागले ही सत्य परिस्थिती आहे. तेव्हा तिसरी शक्ती जीवंत ठेवण्यासाठी शिवसेनेला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले. तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, प्रमोद लभडे, उमेदवार सिमाताई औताडे, शिवाजी रोहमारे, पं.स. सदस्य बाळासाहेब रहाणे, भगीरथ होन, गंगाधर रहाणे, साहेबराव डूबे, चंद्रभान गुंजाळ, संजय गुरसळ, विजय गोर्डे यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

 

याप्रसंगी शहर प्रमुख आसलम शेख, बाजार समितीचे संचालक संजय शिंदे, अशोकराव नवले, प्रमोद शिंदे, सचिन शिंदे, सरपंच वैशाली औताडे, पं.स. माजी सदस्य उत्तम माळी, गोपाळराव सोनवणे, किशोर जावळे, सुरेश साबळे, बाळासाहेब जावळे, प्रकाश औताडे, निवृत्ती औताडे, दादासाहेब औताडे, रमेश झांबरे आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक बाळासाहेब रहाणे यांनी सुत्रसंचालन रियाज शेख यांनी तर आभार धर्मा जावळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*