विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार – सौ.माधुरी नेमाडे

0

रावेर, |  प्रतिनिधी :  पंचायत समितीच्या सभापती पदी सर्व मतदार व निवडून आलेले सदस्य यांच्या पाठबळावर मला जनसेवेची संधी मिळालेली असून या संधीच सोन करण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे मनोगत नवनिर्वाचित सभापती सौ.माधुरीताई नेमाडे यांनी रावेर येथील दै.देशदूतच्या विभागीय कार्यालयास सदिच्छा भेटीप्रसंगी व्यक्त केले.

d97e5228-3838-4e89-80cc-98f1452d336d

दै.देशदूत रावेर विभागीय कार्यालयात सौ.माधुरी नेमाडे यांचे स्वागत कार्यालय प्रमुख दिपक नगरे यांनी केले. यावेळी कृउबा संचालक गोपाळ नेमाडे, चिनावलचे वार्ताहर दिलीप भारंबे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना सौ.नेमाडे यांनी सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवली जात असलेली स्वच्छता मिशन अंतर्गत हगणदारी मुक्त गाव योजना राबविण्यावर पंचायत समिती भर देणार असून केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विभागासाठी कार्यरत असलेल्या विविध योजनांचा दुर्बल घटकांपर्यंत लाभ पोहचविण्यासाठी सहकारी सदस्यांसह कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

भाजपाचे ज्येष्ठ नेते ना.गिरीष महाजन, माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे, खा.रक्षाताई खडसे, आ.हरिभाऊ जावळे यांच्या विकासात्मक विचारांवर वाटचाल करणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.

LEAVE A REPLY

*