Type to search

धुळे

विकासासाठी महायुतीचा उमेदवार विजयी करा – ना.जयकुमार रावल

Share

शिरपूर । उद्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार आणण्यासाठी काशिराम पावरा यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा व शिरपूरचे अमरिशभाई पटेल व सर्वांचे मी भाजपामध्ये प्रवेशाबद्दल स्वागत करतो. आपण सर्वजण देशभक्त आहोत. देशाच्या व राज्याच्या हितासाठी भाजपा महायुतीला मतदान करा. पक्षशिस्त महत्वाची असते.

पक्षाने काशिराम पावरा यांना उमेदवारी दिल्याने फक्त त्यांनाच मतदानासाठी सर्वांनी कामाला लागावे. कोणीही संभ्रम बाळगू नये. आपल्या भागातील सर्व 12 जागा विजयी करायच्या आहेत. कोणीही बंडखेरांना साथ देवू नये. शिरपूर व शिंदखेडा चे उमेदवार नं.1 वर आहोत, आम्ही सोबत विधानसभेत जाणार. अमरिशभाई पटेल यांचे सातत्याने काम आहे. त्यांच्या विकासकामांची चर्चा संपूर्ण राज्यात नेहमीच असते. मी आपल्या खात्या मार्फत भरपूर कामे करुन शिरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी निधी दिला. भावनेच्या आहारी व भूलथापांना बळी न पडता पक्षाचे काम करा. काशिराम पावरा यांना विजयी करुन महाराष्ट्राला बळकट करा असे आवाहन ना. जयकुमार रावल यांनी केले.

भाजपा, शिवसेना, आर.पी.आय. महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ दि.18 रोजी शिरपूर शहरातील पित्रेश्वर कॉलनी भव्य मैदानावर जाहीर सभा पार पडली.

यावेळी अमरिशभाई पटेल म्हणाले, देशात व राज्यात चैतन्याचे वातावरण असून भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या आग्रहामुळे मी भाजपा मध्ये आलो. सत्तेसोबत राहून तालुक्याची प्रगती करायची आहे. देशात व राज्यात आदर्श शिरपूर तालुका घडवायचा आहे. शिरपूर पॅटर्न मार्फत पाण्याचे काम, आरोग्य, पिण्याचे पाणी, उच्च शिक्षण, अनेक सुविधा निर्माण केल्या असे अमरिशभाई पटेल यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, किविप्र.संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, हेमंत पाटील, भरतसिंग राजपूत, अनेक मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!