विकासकामांसाठी नेहमी प्रयत्नशील – भुपेशभाई

0
शिरपूर । प्रत्येक विकासकाम मार्गी लावण्यासाठी पटेल परिवार सतत प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केले.

तालुक्यातील अजनाड बंगला येथे आर.सी.पटेल मेडिकल फाऊंडेशन शिरपूर व शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबीराचे तसेच विकास योजना आपल्या दारी अभियानचे उद्घाटन बुधवार दि. 29 ऑगस्ट रोजी आमदार काशिराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री. पटेल हे बोलत होते. पुढे बोलतांना श्री. पटेल म्हणाले की, आमदार अमरिशभाई पटेल यांना तालुक्याच्या जनतेने गेल्या 32 वर्षांपासून सेवा करण्याची संधी दिल्याने ते जनतेचे ऋण असल्यानेच व त्यांच्या सेवेसाठीच तालुकाभर आरोग्य शिबीर घेत घेण्यात येत आहेत. गोरगरीब जनता व गरजूंसाठी विविध शिबीरे, विकास योजना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याचे काम सुरु आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये फेर्‍या मारण्याचा नागरिकांचा त्रास दूर करुन विविध दाखले व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आहे. प्रत्येक विकासकाम मार्गी लावण्यासाठी पटेल परिवार सतत प्रयत्नशील आहे. तालुक्याच्या सेवेसाठी शिरपूर मध्ये नवीन हॉस्पिटल तयार करणार असून कमी खर्चात सीटी स्कॅन, एमआरआय, विविध तपासणी होईल. मुंबईच्या नामांकित हॉस्पीटल यात लक्ष घालतील. आरोग्य शिबीरांसाठी शहरात देखील आरोग्य केंद्र नेहमीसाठी सुरु करीत असून घरातील आजी बाबा, आईवडील, वृद्ध वडीलधारी मंडळी हेच देव असून त्यांचे पाया पडून बाहेर निघाले की कधीही अपयश येणार नाही. शिरपूर पॅटर्नचे काम सुरुच ठेवले आहे. त्या कामामुळे पाण्यासोबत परिसरातील अनेक शेती शिवार रस्ते देखील तातडीने तयार केले जात आहेत असे भुपेशभाई पटेल यांनी सांगितले.

कार्यक्रमास काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील, दिलीप शांताराम पाटील, सरपंच सोदराबाई जाधव, बुधा पावरा, बभळाजचे जगन्नाथ महाजन, माजी उपनगराध्यक्ष गोकुळसिंग राजपूत, शंकरा आय हॉस्पीटल आनंद, गुजराथचे डॉ. मोहित, डॉ. जयदीप, नांथे सरपंच महेंद्रसिंग राजपूत, होळ माजी सरपंच चंदू पाटील, दर्यावसिंग जाधव, अशोक चव्हाण, शिवाजी राजपूत, महेंद्र राजपूत, अनारसिंग जाधव, जगराम जाधव, डॉ. बाळकृष्ण जाधव, दरबार जाधव, संतोष परदेशी, पुंडलिक पाटील, रणछोड़ नाईक, सोमा शिंदे, संजय पाटील, अनार मांगू जाधव, कैलास पाटील, देविदास पाटील, राजमल जैन, वासुदेव राजपूत, प्रविण राजपूत, संदिप माळी, नवल वंजारी, किशोर माळी, भैरव राजपूत, रोहित माळी, नीलेश वाघ, विकास योजना आपल्या दारी अभियानचे सर्व कार्यकर्तेे उपस्थित होते.

या नेत्र शिबीरात 237 जणांची डोळे तपासणी करण्यात आली. यापैकी 50 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल. उर्वरीत सर्वांना जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.

मनोहर पाटील व भैरव राजपूत यांनी आरोग्य शिबीरांबाबत माहिती दिली. सूत्रसंचलन उपसरपंच मनोहर पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

*