विकासकामांना गती देणार – जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर

0

जळगाव | प्रतिनिधी :   शासकीय कामांसह प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, स्वच्छता, पाणीटंचाई निवारण, महामार्ग चौपदरीकरणाच्या विकासकामांना गती देणार असल्याचे मत नुतन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुपारी पत्रकारांशी वार्तालाप करतांना ते बोलत होते. केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १ लाख २० हजाराचे अनुदान देण्यात येणार आहे. जुन्या योजनेचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करुन नवीन लाभार्थ्यांची यादी देखील करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री पेयजल योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनानाही गती देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले.

मेपर्यंत ७/१२  संगणकीकृत करणार

७/१२ संगणकीकृत करण्यात जळगाव जिल्हा सर्वात शेवटी आहे. त्यामुळे मे पर्यंत ७/१२ संगणकीकरण पूर्ण करणार. तसेच कागदपत्रांचे स्कॅनिंग आणि वसुलीचे उद्दिष्टे देखील पूर्ण करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी दिली.

शाळा गुणवत्ता सुधारणेवर भर

प्राथमिक शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी अधिक भर दिला जाईल. शाळेच्या इमारतींचे बांधकाम आणि सर्व शाळा डिजीटल करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले.

जिल्हा हगणदारीमुक्तसाठी प्रयत्न

संपूर्ण जळगाव जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने मार्च २०१८ पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*