Type to search

नंदुरबार

वाहनचालकांवर कारवाईसाठी ई-चलन प्रणाली कार्यान्वित

Share

नंदुरबार । नंदुरबार येथे वाहतुक शाखेतर्फे वाहन चालकांवर कारवाईसाठी ई चलन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या उपकरणांची वाटप पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या हस्ते कर्मचार्‍यांना करण्यात आले. वाहनचालकांकडून ऑनलाईन दंड आकारणे व वाहनधारकांना कारवाईबाबत एसएमएसद्वारे सुचित करण्यात येणार्‍या ई चलन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. नंदुरबारात ही प्रणाली यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील ईतर शहरांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे.

जिल्ह्यातील वाहतुक शाखेला वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी वाहतुक कर्मचार्‍यांना मोठी कसरत करावी लागते. कुठल्याही परिस्थीत काम करावे लागते.उन,वारा, पाऊस अशा वातावरणात काम करतांना दंडाची पावती फाडावी लागते. अशावेळी वाहनचालकांकडून वादही घातले जात असतात. त्यामुळे कारवाईत अडथळा येतो. ही बाब लक्षात घेता मोठया शहरांमध्ये ई चलन प्रणालीचा वापर केला जातो. त्याचाच वापर आता नंदुरबारतही करण्यात येणार आहे. नंदुरबारात ही प्रणाली यशस्वी झाल्यास शहादा, नवापूर, तळोदा, अक्लकुवा येथे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या प्रणाली अंतर्गत वाहनधारने वाहतुक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना ई चलन उपकरणाद्वारे ऑनलाईन पध्दतीने दंड आकारण्यात येणार आहे. याद्वारे एटीएम किंवा डेबिट कार्डद्वारे दंडाची रक्कम किंवा पेमेंट भरता येणार आहे. वाहनधारकांना त्यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत एसएमएसची सुविधा उपलब्ध होणार आहे. तत्पर कारवाईचे फोटो घेयाची सुविधाही राहणार आहे. नागरीकांसाठी महाट्रॅफिक अ‍ॅपची सुविधा देखील राहील. या उपकरणांचे वितरण वाहतुक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना 24 रोजी करण्यात आले. पोलीस अधिक्षक कार्यालयात संजय पाटील यांन त्यांचे वितरण केले. यावेळी त्यांनी या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून आपलया कामाला ती देण्याचे आवाहन कर्मचारयांने केले. वाहतकीचे नियोजन व्यवस्थीत करून कारवाई करतांना सौजन्याने वागावे अशाही सूचना यावेळी दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक भोये, राहुल शेजवळ उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!