वाळू तस्करांची पोलिसाशी झटापट

0

चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयात आणत असताना पोलिसाला तस्करांनी शिवीगाळ करत मारहाण केली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास नगर-कल्याण रस्त्यावर वासुंदे चौकात हा प्रकार घडला.
निलेश देवीदास वाळेकर (रा. वाडेगव्हाण), अक्षय, अविनाश, सचिन (पुर्ण नावे नाहीत) यांच्याविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
वासुंदे चौकातून वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे यांना मिळाली होती. शिंदे यांनी पोलीस पथकाला आदेश देत तस्करी रोखण्यासाठी पाठविले. पोलीस पथकाने ही वाळुची ट्रक आडवून वाहन चालकाकडे चौकशी केली. सुरू असलेली वाळू वाहतूक अवैध असल्याचे लक्षात येताच पोलीस कर्मचारी संतोेष गोरख देसाई हे तस्करी करणार्‍या वाहनात बसवून ते जिल्हाधिकारी कार्यालयात नेत होते. ही ट्रक नगरकडे घेऊन जात असताना टाकळी ढोकेश्‍वर ते वासुंदे शिवारात पाठीमागून एक स्वीप्टकार आली. त्यातील तिघांनी मोठ्याने आरडाओरड करीत कार ट्रकच्या समोर आडवी घातली. ट्रकमध्ये बसलेल्या पोलीस कर्मचारी देसाई यांना शिवीगाळ दमदाटी करीत धक्काबुक्की करुन खाली खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात पोलीस कर्मचार्‍याच्या वर्दीची काही बटने तुटली आहेत. हा प्रकार घडूनही देसाई यांनी वाळुचा ट्रक सोडला नाही. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एच. झेड गाडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*