वाळूने भरलेले ट्रॅक्टर पायावरुन गेल्याने विद्यार्थीनी जखमी

0

जळगाव । शहरातून वाळू वाहतुक बंद असतांना देखील वाळूमाफियांकडून सर्रासपणे अवैध रित्या वाळू वाहतुक केली जात आहे. फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या तरुणीच्या पायावर वाळूने भरलेले ट्रॅक्टर गेल्याची घटना आज दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. तरुणीला तात्काळ जिल्हा सामान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

फुले मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी शुभांगी सुनिल पाटील (वय-24. रा. भातखंडे ता. एरंडोल) ही विद्यार्थीनी आपल्या मैत्रीणींसोबत आली होती. फुले मार्केटमध्ये खरेदी झाल्यानंतर घरी जात असतांना दोघ तरुणी टॉवर चौकात उभ्या होत्या. याचवेळी शिवाजी नगरकडून वाळूने भरलेले (एमएच 19. 6821) क्रमांकाचक ट्रॅक्टर भरधाव वेगाने टॉवर चौकाकडे येत होते. याचवेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या शुभांगी पाटील यांच्या डाव्या पायावरुन वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक गेल्याने तरुणी जखमी झाली.

तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार
विद्यार्थीनीच्या पायावर ट्रॅक्टरचे चाक गेल्याचे समजात त्याठिकणी असलेल्या नागरिकांनी जखमी तरुणीस उपचारार्थ तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी तरुणीच्या पायाला दुखापत झाली असून तीच्यावर उपचार सुरु आहे.

शहरातून होतेय अवैध वाळू वाहतुक
जिल्ह्यातील सर्व वाळू ठेके बंद करण्यात आले आहे. तरी देखील वाळू माफीये चोरट्यापद्धतीने अवैधरित्या वाळू वाहतू करीत आहे. दरम्यान शहरातून देखील वाळू वाहतुक करण्यास बंदी असतांना देखील शहरातून सर्रासपणे वाळू वाहतुक होत असल्याने महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

ट्रॅक्टरचालकाने काढला पळ
टॉवर चौकात उभ्या असलेल्या तरुणीच्या पायावर ट्रॅक्टरचे चाक गेल्याचे समताच ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर जोरात पळवीत घटनास्थळहून पळ काढला.

वाळू माफियांना पोलिसांचे अभय
टॉवर चौकात दिवसरात्र रहदारी असते. तरी देखील वाळू याठिकाणाहून अवैध रित्या वाळू वाहतुक केली जात आहे. मात्र पोलिसांसह महसूल प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसून कानडोळा केला जात असल्याने अवैध रित्या वाळू वाहतुकदारांना महसूल विभागासह पोलिसांचे अभय मिळत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुुरु आहे.

LEAVE A REPLY

*