वादामुळे रखडला मृण्मयीचा ‘रुबिक्स क्युब’

0
मृण्मयी देशपांडे ही मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
लग्नानंतर यंदा तिचा अद्याप एकही चित्रपट रिलीज झालेला नाही. पण तिचा एक अत्यंत चांगला चित्रपट नावाच्या वादामुळे रखडला आहे.
महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटात मृण्मयी गश्मीर महाजनीबरोबर झळकणार आहे.
या चित्रपटामध्ये मृण्मयीचा एक वेगळाच खास लूकही आपल्याला पाहायला मिळणार आहे.
रुबिक्स क्युब या चित्रपटाच्या नावाच्या वादामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले आहे. महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाचे म्युझिक लाँच अनेक महिन्यांपूर्वी सलमानच्या उपस्थितीत धूमधडाक्यात झाले होते.
पण पुढे नावाचा वाद निर्माण झाल्याने, चित्रपटावर कोर्टाची स्थगिती आली. आता हा चित्रपट नाव बदलून रिलीज होणार असल्याची माहिती मिळत आहे

LEAVE A REPLY

*