वाण्याविहिरजवळ मोटरसायकल अपघातात शिक्षक ठार : एक गंभीर

0

अक्कलकुवा । अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गांवर वाण्याविहीर ते सतोना दरम्यान मोटरसायकल अपघातात एका माध्यमिक शिक्षक जागीच ठार झाला तर एक शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंकलेश्वर बर्‍हाणपूर राष्ट्रीय महामार्गवरील सतोना गावाजवळ अवजड वाहनाने तीन वाजेच्या दरम्यान मोटरसायकल (क्र.एमएच 39 पी1939) ला जबर धडक दिल्याने देवमोगरा पुनर्वसन येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक सुरेश सायसिंग चव्हाण हे जागिच ठार झाले. ते शहादा तालुक्यातील तितरी येथील रहिवासी होते. सदर मयत व जखमी शिक्षक एक ते दीड तास घटनास्थळी पडलेले होते.

त्यांच्यासोबत असलेले विद्यालयाचे मुख्याध्यापक राकेश पुंजरू महिरे हे गंभीर जखमी झाले असून ते नंदूरबार येथील रहिवासी आहेत. दोन्ही शिक्षक रोज नंदुरबार येथून ये जा करीत होते. राकेश महिरे यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत सुरेश चव्हाण हे अतिशय मनमिळाऊ व मवाळ स्वभावाचे होते.

त्यांना दोन मुली, एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. जखमींना उपचारासाठी अक्ललकुवा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी असल्याने नंदुरबार येथे राकेश पुंजरू महिरे यांना नेण्यात आले. शिवसेनेच्या रूग्णवाहिनेने अक्कलकुवा येथे आणण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने काही वेळ जखमींवर उपचार झाले नाहीत.

मात्र काही वेळाने वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचार करून जखमीस नंदुरबार येथे हलविण्यात आले. मयत शिक्षकांच्या नातेवाईकांनी अक्ललकुवा येथील ग्रामीण रूग्णालयात आक्रोश करत हंबरडा फोडला. चव्हाण यांना अक्कलकुवा येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*