Type to search

जळगाव

वाघनगर, द्रोपदीनगरात विद्युतपंपांची चोरी

Share

जळगाव । शहरातील वाघनगर व द्रोपदीनगरात विद्युतपंपाची चोरी झाली. वाघनगरातील चोरीप्रकरणी संदीप बापू पाटील (हरिविठ्ठलनगर) यास नागरिकांनी पकडून त्यास चोप दिली. नंतर चोरट्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, त्याचे अन्य दोन साथीदार विद्युतपंप घेवून पसार झाले.

द्रोपदीनगरातील अनिता राजेश साळुंखे यांचा मानराज पार्कमधील आठ हजार रुपये किमतीचा विद्युतपंप चोरट्यांनी 7 ते 8 ऑक्टोबरदरम्यान लंपास केला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद झाली. तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहेत.

चोरट्यांचा पाठलाग
सावखेडा बुद्रूक शिवारातील वाघनगरात बांधकाम सुरू आहे. त्यासाठी नजीकच्या नाल्यावर पाणी खेचण्यासाठी हजार रुपये किमतीचा विद्युतपंप लावण्यात आला होता. या पंपास चोरट्यांनी शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता लांबवले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. त्यातील संदीप पाटील या चोरट्यास नागरिकांनी पकडले, तर त्याचे अन्य दोन साथीदार विद्युतपंप घेऊन पसार झाले. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात राहुल प्रभाकर पवार (भोईटेनगर) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेड कॉ.सतीश होळनार करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!