वाईन शॉपवर महिलांचा हल्लाबोल

0
धुळे / किराणाचे साहित्य ठेवण्यासाठी जागा घेतली आहे असे सांगून खरेदी केलेल्या घरात थेट वाईन शॉपचा मद्यसाठा आणून ठेवला.
याची माहिती मिळताच परिसरातील महिला नागरिकांनीहल्लाबोल केला. दारू दुकानाच्या फलकावर शाई फेकून काठीने फलकही फेकून दिला.
संतापलेल्या महिलांचा आवेश पाहून दुकानात असलेल्या चौघांची भंबेरी उडाली. यामुळे भीतीपोटी कोणीही बाहेर आले नाही. त्याचबरोबर महिला नागरिकांनी याच भागात सुरू असलेल्या कुणाल बिअर बारसमोरही निदर्शने केली.

ही दारू दुकाने हटविण्याची मागणीही पोलिसांसह जिल्हाधिकार्‍यांकडे केली. शहरातील उच्चभ्रू वसाहतींमध्ये नकाणे रोडवरील प्रमोदनगरचाही उल्लेख होतो.

या वसाहतीमधील एका घरात मद्यविक्रीचा व्यवसाय सुरू केला जाणार आहे. तशी चिन्हे गेल्या काही दिवसांपासून दिसत होती.

शहरातील प्रमोदनगर परिसरात नव्याने सुरू होणार्‍या वाइन शॉपला प्रखर विरोध करत नागरिकांनी दरवाजावर संताप काढला, तर दुसर्‍या ठिकाणी सुरू असलेल्या बिअर बारसमोर जोरदार निदर्शने केली.

LEAVE A REPLY

*