वर्‍हाडीपाडा शेतशिवारात महिलेचा खून

0
नंदुरबार / धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून केल्याची घटना नवापूर तालुक्यातील वर्‍हाडीपाडा येथे घडली. महिला तिलासर येथील असून खुनाचे कारण व आरोपीही अज्ञात आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विसरवाडी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील वर्‍हाडीपाडा गावाच्या शिवारातील राकेश वसावे यांच्या शेतात सकाळी सहा वाजता एका महिलेचा मृतदेह आढळून आला.
तेथील पोलीस पाटलांनी विसरवाडी पोलीसांना याबाबत माहिती दिली. विसरवाडी ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर महिलेच्या तोंडावर, छातीवर तसेच पोटाच्या भागात धारदार शस्त्राने असंख्य वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे निदेर्शनास आल्यावर नंदुरबार येथून श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने शेतातून महामार्गापर्यंत माग दाखविला.

सदर महिलेबाब माहिती काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्यावर महिला ही तिलासर येथील जोंदूबाई नवशा गावीत असल्याचे स्पष्ट झाले.

महिला गुरूवारी रात्रीपासून घरी आलेली नसल्याचे तिच्या घरच्या लोकांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*