वराड येथे कर्जबाजारी शेतकर्याची आत्महत्त्या
Share

वराड, ता.धरणगाव । वार्ताहर – धरणगाव तालुक्यातील वराड येथे कर्जबाजारी शेतकर्याने आत्महत्त्या केल्याची घटना दि.18 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.
येथील विश्वास प्रताप पाटील (वय 43) याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली. सततच्या नापिकी व कर्जबाजारी असल्यामुळे त्याने सदर पाऊल उचलले. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, अजूनही शेतकरी मात्र कर्जाच्या दडपणाखाली जगात आहे आणि गेल्या दोन वर्षापासून पाऊस कमी झाल्यामुळे अगोदरच शेतकरी सतत होणार्या कर्जामुळे कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळे कुटुंब मोठ असल्यामुळे विश्वास पाटील हा चिंताग्रस्त होता.
सोसायटीचे कर्ज व हात उसनवार कर्ज कसे फिटणार व माझे सुख समाधानाचे दिवस कधी येणार, उपवर झालेली मुलगी लग्न कधी होईल की, नाही पैश्यांचा प्रश्न, अशा विवंचनेत या तरुण शेतकर्याने पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. घटनेची फिर्याद पाळधी पोलीस येथे विकास पाटील यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ.निकुंभ व हे.काँ. चौधरी, किशोर चंदनकर करीत आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि.19 रोजी सकाळी 10 वाजता वराड येथून निघणार आहे.