Type to search

जळगाव

वरणगावात कोळशाच्या मालगाडीला आग

Share
वरणगाव फॅक्टरी दि १६ ( वार्ताहर )  वरणगाव रेल्वे स्टेशन अप लाईनवर उभी असलेल्या रेल्वे मालगाडी डब्यात असलेल्या कोळशाच्या गाडीला अचानक आग लागल्याची घटना दि १६ मंगळवार रोजी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान घडली असून रेल्वे कोळशाची आगीची घटना दोन माहिन्यात चौथी घडली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडी नं 12140310734  इंजीनपासून २५  नंबरच्या डब्याला आग लागल्याची माहिती जवळच असलेल्या आंचेगाव स्टेशनवरून वरणगाव स्टेशन मास्तर माहीती देण्यात आल्याने स्टेशनवरील लुप लाईनवर कोळशाची गाडी उभी करण्यात आली . रेल्वे प्रशासनाने आगीची खात्री करून ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव अग्निशामक विभागाला बोलवून रेल्वेचा विजपुरवठा बंद करुन आग लागलेल्या कोळशाला पाणी मारून विझवीण्यास आली . वरणगाव स्टेशनवरील कोळशाला आग लागल्याच्या घटना जास्त प्रमाणात घडत असल्याने रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे . अन्यथा मोठी घटना घडू शकते .  वरणगाव फॅक्टरी अग्निशामक विभागाचे कर्मचारी   व्ही व्ही कांबले,  जे.पी पाटील ,  सी के गवई , एम डी सोनवणे , एस .जी. जैस्वाल. , एम.डी सोनार , एम.आर.कोळी , एस.एम् पवार , डी.व्हि पाटील  , वरणगाव  रेल्वे  स्टेशन प्रबंधक हुकुम सींग पाटील , मच्छीद्रनाथ पाटील ,  दिपक कुमार मंडल ,  दिपक झोपे  , आरपीएफ जवान अरूण माळी , गार्ड दिनेश कुमार ,   एम एच ठोसर  , लाईन मन सुधीर वाघादे ,  रविंद्र बेडाले , हरी  शिंदे , आदी कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणली . जिवीतहानी टळली .
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!