वरणगांव पोलीस्टेशन मध्ये बढे पतसंस्थेच्या 21 कर्जदारांवर गुन्हें दाखल

0

वरणगाव| वार्ताहर :  येथील चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या 21 कर्जदारांवर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखा परिक्षण नाशिक यांच्या फिर्यादिवरुण19 कोटी 92 लाखाचाअपहरणाचा गुन्हां दाखल करण्यात आला आहे .
या विषयी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की , येथील चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को ऑप .क्रे. सोसा . लि . वरणगांव ता भुसावळ या संस्थेच्या 23 संचालक व एक मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे विरूद्ध वरणगांव पोलीसात दि 21 /10/ 2010 रोजी गुन्हां दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हां सीआयडी याचे कडे तपासावर आहे .

पंरतु लेखा परिक्षण वेळी मागील मुदतीत वितरण केलेल्या कर्जाची मा . सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील दि १ /६/२०१२ च्या परिपत्रकीय सुचेननुसार कर्ज प्रकरणाची छाननी करुन संस्थेने मंजुर केलेल्या व मुख्य कार्यालया मार्फत वाटप करुण उचल करतांना संस्थेला जाणुनबुजुन परिपूर्ण कागदपत्रे न देणे , मालमत्ता तारण न देणे , जाणीवपूर्वक कर्जाची परतफेड न करणे , संस्थेस करुण दिलेल्या करार नाम्याचे उल्लघन करणे ईत्यादी कारणानी असुरक्षित कर्ज वितरण केल्याचे निर्दशनांस आलेले आहे.

त्यामुळे संस्थेचे पर्यायाने सभासंदाची व संस्थेच्या ठेविदाराची फसवणुक व विश्वास घात केलेला आहे . म्हणून कर्जदार देखील संस्थाचालक संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी इतके जबाबदार आहेत . त्यामुळ दि १६ / ८ / २०१३ रोजी २६ कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

परंतु त्यातील २१ कर्जदारांनी भरणा केलेला नाही. सदर कर्जदारांना पुरेसा वेळ व संधी देवुन सुद्धा त्यांनी कर्ज भरणा केलेला नसल्याने त्यांची कर्ज बुडव्याची वृत्ती दिसत असल्याने खालील कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे .

रविंद्र कुलदिपासिंग  चाहेल रा भुसावळ , यांचे कडे अखेर येणे कर्ज 3९९४७४ , गजानन प्रभाकर वंजारी रा वरणगांव कर्ज ११६०२२३ , सुभाष काशिनाथ माळी कर्ज ६९३१५३ , अनिल लक्ष्मण चौधरी रा वरणगांव कर्ज ९३४९६७६ , प्रमोद बन्सीलाल संचेती रा मलकापूर जि बुलढाणा कर्ज १५२९७४२ , राजकुमार दयाराम सिंधी रा भुसावळ कर्ज २४८२७८५, अनिल नाशिक झोपे रा वरणगांव कर्ज ३२९८८८ , नरेंद्र सुपडू मोरे तपतकठोरा ता भुसावळ कर्ज २४९६३६३ , अफजलशहा रोशनशहा रा वरणगांव कर्ज ४९९७८४१, साबीरशहा रोशनशहा रा वरणगांव ९५५२५१ , गोविंद ज्ञानेश्वर मांडवगणे रा वरणगाव कर्ज ४९५३९६८ , रामराव तुकाराम पाटील रा नाशिक कर्ज १३o५९००००, सौ .नयना किरण खडके रा पुणे ४३ कर्ज ५०००००१ , सुशील पद्माकर पारकर शामल एंटरप्रायजेस रा जळगांव ४९९९१४o , बोथराम देगलाल मंहता रा जळगांव कर्ज ३३२६५७०.

LEAVE A REPLY

*