Type to search

आरोग्यदूत

वमनाने शरीरशुद्धी

Share

झहेीेींशपीळींर्ळींळीूं चे तीन रुग्र 22 वर्षीय मुलीला उन्हात गेल्यानंतर त्वचेवर पांढरे डाग पडतात, 12 वर्षीय मुलाला उन्हामुळे उलट्या होतात तर एका स्त्रीला उन्हामुळे डोकेदुखीचा त्रास. तिघांनाही वमन करताच उन्हाची अ‍ॅलर्जी पार गेली. अहो महाभूताची अ‍ॅलर्जी असून कसे जगायचे आपण. दमा आणि सर्दी या कितीतरी रुग्णांनी वमन झाल्यानंतर उन्हाळ्यात नद्या जशा कोरड्या पडतात तसा अनुभव घेतला नसता. पूर्वी त्यांचे नाक म्हणजे बारमाही वाहणार्‍या नद्या होत्या. स्त्रियांना ‘मासिक पाळी’ म्हणजे असून अडचण नसून खोळंबा वाटतो. दीड वर्षापासून खोळंबा झालेली एक रुग्ण वमनानंतर 4 दिवसांतच पाळी आली. ‘पाळी येणे’ हा दीड वर्षानंतर आलेला आनंद ढसाढसा रडून सांगते. कारण कुटुंबाला अंकुर फुटण्याची तिची आशा आता पल्लवित झाली होती. तर एक जोडपे, पुढील महिन्यात र्खीीीश घ्यायचा म्हणून या महिन्यात समजून उमजून बीज शुद्धी. शरीर पुष्ट्यर्थ उभयता वमन करवून घेतात. याला म्हणावे फॅमिली प्लॅनिंग.

स्पाँडिलिसीसची एक रुग्ण. दुखणे मणक्याचे असो वा पोटाचे वा पाळीच किंवा दम्याचे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संबंध भारत एक आहे. त्याचे काही दुखणेच असेल तर त्याची उकल दिल्लीतून संभव. तसेच नखापासून केसापर्यंत संबंध शरीर एक आहे. नदीला पूर आला म्हणजे हे पाणी संबंध शरीरभर कुठेही पसरणार त्यामुळे स्पेशालिटीच्या जमान्यातसुद्धा आयुर्वेदाचे सर्वसमावेशक उत्तर एकच वसंतात वमन, पावसाळ्यात बस्ती नी शरदात जुलाब, रक्तमोक्षण तर या स्पाँडिलिसीसच्या रुग्णानेसुद्धा वमन घेतले नी त्यांची ‘मान’ ‘सन्मान’ झाली. अगदी ठअ ऋरलीेीं + र्ींश असणार्‍यांनी सुद्धा पूर्ण उपशय अनुभवला. स्थौल्याचे रुग्ण हलकेपणा अनुभवतात तर त्वचेचे रुग्ण उजळतात. प्रत्येकाचे ब्रह्मांड ठिकाणावर येते. आम्लपित्त, ज्वराचा मुळापासून काटा केवळ वमनाने निघतो.

मलावरोधचा अवरोध गेला. गाडी नियमित सुरू झाली. केवळ रुग्णच नव्हे तर काही डॉक्टरसुद्धा आमचे ‘वांतीदूत’ होतात. त्यांनी स्वत: वमन करून अनुभूती घेतली की कितीतरी व्याधींना वमन परिपूर्ण उत्तर ठरू शकते, असे मत ते अनुभवांती बनवतात. वांतीदूत होण्यासाठी काही आजारच असावा अशी गरज मुळीच नाही. असेच एक जिज्ञासू, ‘तुमचं वमन वगैरे काय ते असतं ते सहज करवून घ्यायचळां’ म्हणाले, परंतु मला काहीच आजार नाही नी जन्मात केव्हा उलटी झालेली नाही. तेव्हा मी कसा ओकणार? अशी प्रश्नांची सरबत्ती, 5 दिवस तूप पिऊन झाले. वमनाला बसले, दिलेल्या सूचना व्यवस्थित पाळल्या. वेग सुरू झाले शेवटी पित्त पडू लागले, खूप पित्त पडले, छान वाटले म्हणाले ‘स्वत:ला स्वस्थ समजणारा मी एवढे माझ्या पोटात होते आणि ते पित्त एवढे कडू जहर असते हे एक कडू सत्य आहे. सत्य फार कडू असते.’ हे वापरून गुळगुळीत केलेले वाक्य परंतु वमन घेतलेला मनुष्य म्हणेल. ‘सत्य खरंच फार कडू असते, परंतु ते पित्ताएवढे कडू निश्चित नसते.

वमनापूर्वी 3.5.7 दिवस रुग्णाला तूप अथवा तेल घ्यावे लागते या स्नेह चिकित्सेबद्दल आमचे एक स्नेही चेष्टेने नमनाला ‘घडाभर तेल’ऐवजी ‘वमनाला घडाभर तेल’ म्हणतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल. वमनापूर्वीच या वमनादरम्यानच अनेक रुग्ण सांगतात, अहो आजार अर्धा बरा झाल्यासारखे वाटते. एका विद्यार्थ्याची आई, मधुमेह, सांधेदुखी, सरसो तेल प्यायलला दिले. वमनाची गरजच पडली नाही. वाळूमध्ये पाणी टाकताच जीरावे त्याप्रमाणे शरिरात तेल जिरले. त्यांच्या मधुमेहाला वाताला बरे वाटले.

उपरोक्त सर्व व्याधीग्रस्त रुग्ण आणि स्वस्थ ज्यांनी स्वत: वमन करवून घेतले त्यांचा आम्ही ‘वांतीदूत’ म्हणून गौरव करतो. गंगेचे पाणी पवित्र, त्यामध्ये आंघोळ केल्यास पाप धुवून निघतात. अशी आपली श्रद्धा आहे. होय हे सत्य असेल सुद्धा. यापूर्वीचे पाप धुवून निघाले. परंतु पुढे पुन्हा होणार नाही, यासाठी काळजी घेणे आवाश्यक असते. त्यासाठी स्वभाव परिवर्तन आवश्यक कारण पापाचे मूळ तिथे आहे. वमनाने घावूक शुद्धी झाली. कपडा धुवून निघाला. स्टार्च करून दिला त्यावर पुन्हा धूळ जमणार नाही, ही जबाबदारी रुग्णाची, त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे हे आमचे कर्तव्य. ‘वांतीदूत’ हा गौरव केवळ वमन करवून घेण्यासाठी नव्हे तर त्यामागे दडलेला ऋतुशोधनाचा, आरोग्याचा संदेश आचरणात आणण्यासाठी, जीवनात सवयीमध्ये, व्यसनामध्ये, स्वभावामध्ये, आमुलाग्र बदल करणार्‍यांसाठी आहे. त्याचा उहापोह पुढील लेखामध्ये.
वैद्य सौ. अर्चना तोंडे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!