Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

लोणी – अवकाळी वादळी पावसाने ५० लाखांचे नुकसान

Share

लोणी (वार्ताहर) – बुधवारी सायंकाळी लोणी,बाभळेश्वर,रा झालेल्या अवकाळी वादळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. लोणी खुर्द गावातील साई कदंबा डेअरी अँड ऍग्रो प्रोडक्ट्स लिमिटेडचे पत्रे उडाल्याने पावसाचे पाण्याने मशिनरी भिजल्याने सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले.

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने आसमंत धुळीने व्यापून टाकला. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे नागरिक अक्षरशः घाबरून गेले. गहू, हरभरा, कांदा या पिकांची काढणी सुरु असल्याने हातातले काम सोडून जीव वाचवण्यासाठी शेतकरी आणि शेतमजूर पळापळ करीत होते.मोठमोठी झाडे उन्मळून पडत होती.विजेचे खांब जमीनदोस्त होत होते. उघडया डोळ्यांनी हे भयावह दृश्य अनेकांनी बघितले. शेतात उभे असलेले गहू,मका हि पिके जमीनदोस्त झाली. ज्यांच्या शेतात पीक काढणीचे काम सुरु होते ते अर्ध्यावर सोडून घर गाठण्याशिवाय मार्ग उरला नव्हता. कोट्यावधींचे नुकसान काही वेळात झाले. वीज पुरवठा खंडित झाला.अवघ्या दोन-अडीच तासात निसर्गाने होत्याचे नव्हते करून टाकले. प्रत्येक वेळी निसर्गाचा फटका मलाच का? या बळीराजाच्या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.ज्याचे कुटुंब फक्त शेतीवर अवलंबून आहे त्याची अवस्था न बघवणारी झाली आहे.बुधवारी सायंकाळी लोणी, बाभळेश्वर, प्रवरानगर परिसरात झालेल्या अवकाळी वादळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. लोणी खुर्द गावातील साई कदंबा डेअरी अँड ऍग्रो प्रोडक्ट्स लिमिटेडचे पत्रे उडाल्याने पावसाचे पाण्याने मशिनरी भिजल्याने सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले.

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने आसमंत धुळीने व्यापून टाकला. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे नागरिक अक्षरशः घाबरून गेले. गहू, हरभरा, कांदा या पिकांची काढणी सुरु असल्याने हातातले काम सोडून जीव वाचवण्यासाठी शेतकरी आणि शेतमजूर पळापळ करीत होते.मोठमोठी झाडे उन्मळून पडत होती.विजेचे खांब जमीनदोस्त होत होते. उघडया डोळ्यांनी हे भयावह दृश्य अनेकांनी बघितले. शेतात उभे असलेले गहू,मका हि पिके जमीनदोस्त झाली. ज्यांच्या शेतात पीक काढणीचे काम सुरु होते ते अर्ध्यावर सोडून घर गाठण्याशिवाय मार्ग उरला नव्हता. कोट्यावधींचे नुकसान काही वेळात झाले. वीज पुरवठा खंडित झाला.अवघ्या दोन-अडीच तासात निसर्गाने होत्याचे नव्हते करून टाकले. प्रत्येक वेळी निसर्गाचा फटका मलाच का? या बळीराजाच्या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.ज्याचे कुटुंब फक्त शेतीवर अवलंबून आहे त्याची अवस्था न बघवणारी झाली आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!