लोणावळा : ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना नोटीस

0

टीव्हीवरील प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ सध्या वादात सापडण्याचे चिन्ह दिसत आहे.

लोणावळा नगर परिषदेने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना नोटिस बजावली आहे. पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवत लोणावळ्यात अवैध बांधकाम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

इंडेमॉल इंडिया प्रा.लि.द्वारा श्री.सर्वेशसिंग सुपरव्हिझिंग प्रोड्युसरने (501 समर्थ वैभव ओशिवरा अंधेरी, मुंबई) इंडिया व एबीसी बेअरिंग कंपनी वार्ड जी लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे या मिळकतीमध्ये विनापरवाना आणि अनधिकृत बांधकाम जागेवर केल्याचे नोटीशीत म्हटले आहे.

नोटिस प्राप्त झालेपासून 32 दिवसांच्या आत सदरचे विनापरवाना व अनधिकृत पक्के व कच्च्या स्वरुपाचे बांधकाम काढून टाकावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*