लोणावळा : एकविरा देवी मंदिराचा कळस चोरीला

0

लोणावळ्यातील कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरावरील सोन्याचा मुलामा दिलेला पंचधातूचा कळस चोरीला गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

सकाळी आठच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताला हा प्रकार लक्षात आला. त्याने लगेचच मंदिर प्रशासनाला याबाबत माहिती दिली.

घटनास्थळी पोलीस पथक आले असून पोलीस उपअधीक्षक शिवतारे हेही दाखल झाले आहेत.

एकविरा देवी ही ठाकरे घराण्याचे कुलदैवत आहे.

LEAVE A REPLY

*