लोकाभिमुख पोलिसिंगला प्राधान्य

0

जळगाव / जिल्हा संवेदनशील आहे. त्यातच शहरातील वाळु वाहतुकीमूळे वाद होवुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे उदाहरणे आहेत.

त्यामूळे शहरातील बेशिस्त पार्किंग आणि अवैध वाळु वाहतुकीला शिस्त लावणार तसेच लोकाभिमुख पोलिसिंगसाठी प्राधान्य राहिल, अशी ग्वाही पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.

जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे बोलत होते.

याप्रसंगी नवनिर्वाचीत अप्पर पोलिस अधिक्षक बच्चन सिंग उपस्थित होते.

पुढे बोलताना पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे म्हणाले, की जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेची माहिती घेतली असून जिल्ह्यातील मोठ्या घटनांचा तपास जलदगतीने लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अवैध वाळू वाहतुक तसेच त्यातून होणारे पोलिस व अधिकार्‍यांवर होणारे हल्ले याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून भूमिका घेतली जाईल.

तसेच शहरातील वाहतुकीच्या समस्येवर देखील पार्किंग बाबतचा प्रश्न महापालिका, शहर वाहतुक शाखेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

 

LEAVE A REPLY

*