लोकशाही बचावतर्फे उद्या धरणे आंदोलन ; आज मार्गदर्शन, न्यायालयासाठी फाईलचे काम होणार

0

नाशिक : नाशिक महापालिकेचा निकाल लागल्यानंतर त्यात भाजपला बहुमत मिळाले. परंतु अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले. याविरोधात लोकाशाही बचाव आंदोलन पुकारण्यात आले असून त्या अंतर्गत उद्या 3 मार्च रोजी सकाळी 9 वाजता रॅली काढण्यात येणार असून त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाजवळ धरणे आंदोलन होणार आहे.

निकालाविरोधात सर्वच उमेदवार आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून त्याबाबतची एक बैठक हुतात्मा स्मारकात घेण्यात आली आहे. आता पुढील नियोजन म्हणून प्रत्येक प्रभागातील पराभूत टीमकडून न्यायालयीन लढाईसाठी शुल्क वसूल केले जात आहे. आतापर्यंत काही प्रभागातील उमेदवारांच्या ग्रुपने ते शुल्क जमा केलेले आहे. सामूहिक निधी जमा करून त्याव्दारे न्यायालयीन लढाई लढली जाणार आहे.

त्यासाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता एक पत्रकार परिषद होणार आहे. त्यात पुढील आंदोलनाची भूमिका मांडली जाणार आहे. त्यानंतर पंडित कॉलनीतील अ‍ॅड. जयंत जायभावे यांच्या कार्यालयात दुपारी 4 वाजता प्रभागनिहाय फाईल केली जाणार असून ती फाईल न्यायालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती या आंदोलनाचे समाधान भारतीय यांनी दिली.

सोशल नेटवर्किंगद्वारेही लोकशाही बचाव आंदोलनाकडून मेसेजेस व्हायरल केले जात असून जास्तीत जास्त उमेदवारांना या लढ्यात सहभागी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रभागनिहाय सभाही घेण्यात येत आहेत. दरम्यान न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्वच सदस्यांना आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यात काही प्रभागातील सदस्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

LEAVE A REPLY

*