लॉजीस्टीक कंपनीला गंडविल्याने एकावर गुन्हा

0
जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-शहरातील अश्विनी लॉजीस्टीक कंपनीच्या कार्यालयाचे भाड्याचे पैसे न देता त्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याने एका जणाविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, ऑटोनगरमधील दत्तात्रय बिल्डींग येथे अश्विनी लॉजीस्टीकचे कार्यालय आहे.
या कार्यालयात साधुराम चतुरसिंग खटकड हे कार्यारत आहेत. डीएचडीसी कंपनीकडून ट्रान्सपोर्टचे भाड्याचे 2 लाख 3 हजार 600 रुपये खटकड यांच्याकडे आले होते.

ही रक्कम खटकड यांनी कंपनीच्या खात्यात न भरता स्वतःच्या फायदा वापर करुन कंपनीचे फसवणुक केली. मार्च ते जुन 2017 दरम्यान खटकड याने कंपनीची फसवणुक केली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये दिपक समुद्रसिंग यांच्या फिर्यादीवरुन भाग 5 गुरनं 144/17 नुसार भादंवि कलम 408,420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सचिन बागुल करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*