लेखानगरजवळ अपघात ; महिला ठार

0

नवीन नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर लेखानागर परिसरात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास ट्रकच्या चाकाखाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाला. छाया आण्णासाहेब कटारे (वय ५५, रा. चेतनानगर) असे या महिलेचे नाव आहे.

बालभारतीसमोर महामार्गावरुन एम एच 15 डी एन 8621 मोटारसायकलने जात असलेल्या आण्णासाहेब कटारे व छाया आण्णासाहेब कटारे यांची दुचाकी गतिरोधकावर हादरे बसल्याने अनियंत्रित झाली.

मागील सीटवर बसलेल्या छाया कटारे वय 55 या खाली पडल्या. त्याचवेळी महामार्गावरून जात असलेल्या ट्रक क्र. आर.जे.15 जी.ए.4085 च्या चाकाखाली त्या सापडल्याने चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी ट्रक चालक व मालक नत्थाराम हुकूमराम माळी, रा. साकडा, ता.पोखरण, जि. जैसलमेर, राजस्थान यास ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

*