लिंक रोडवर पून्हा सजू लागले भंगार बाजार

0

सातपूर | दि.२ प्रतिनिधी- बहुचर्चीत भंगार बाजार हटले असले तरी प्रत्यक्षात  त्या जागांवरील व्यवसाय मात्र बिनबोभाटपणे सूरू असल्याचे चित्र आहे.

मनपा प्रशासनाने सातपूर अंबड लिंक रोडवरील भंगार बाजार पूर्ण शक्ती पणाला लावून हटवले. मात्र या

व्यावसायिकांना साहित्य  हटवण्याची परवानगी देण्यात आली.

मनपाने तोडलेल्या शेडचे साहीत्य तेवढे हटवले गेले. बाकी माल तसाच पडून ठेवण्यात आला. परिसरात प्लॅस्टिकच्या शेडच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवसाय बिनदिक्कत सूरू असल्याने खरच भंगार बाजार हटले काय असा सवाल उपस्थित केला जाऊ लागलेला आहे.

मोठमोठे प्लस्टिकचे ढिग आजही याठिकाणी पडलेले दिसून येत आहेत. व्यवसायाची जोडणी व मांडणू सूरू करण्यात आलेली आहे. येणार्‍या काही महिद्यात याठिकाणी पून्हा व्यवसाय थायल्याचे दिसून आल्यास आश्‍चर्य वाटू नये अशी स्थिती आहे.

या जागा भंगार व्यावसायिकांच्या मालकीच्या आहेत. त्याठिकाणी असलेले बेकायदेशीर वापरातून ही मोहीम राबविण्यात आल्याचे जाणकारांचे मत आहे. येणार्‍या काळात याठिकाणी व्यवसायीक इतर व्यवसायाला परवानगी मिळवून पून्हा जोमाने व्यवसाय थाटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*